Stray Dog Sttack | पावणे दोन वर्षांच्या चिमुकल्यावर कबनूरमध्ये भटक्या कुत्र्याचा हल्ला

Stray dog attack‌
Stray Dog Sttack | पावणे दोन वर्षांच्या चिमुकल्यावर कबनूरमध्ये भटक्या कुत्र्याचा हल्लाFile Photo
Published on: 
Updated on: 

कबनूर : धुळेश्वरनगर परिसरात शनिवारी भटक्या कुत्र्याने पावणे दोन वर्षांच्या चिमुकल्यावर हल्ला करून त्याला गंभीर जखमी केले. शंभूराजे पिसे असे त्याचे नाव असून त्याच्यावर इचलकरंजी येथील इंदिरा गांधी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण असून, भटक्या कुत्र्यांचा तातडीने बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकांतून होत आहे. शंभूराजेच्या डाव्या हाताला व पायाला कुत्र्याने चावा घेतला. तसेच कपाळावर आणि नाकाखालीही जखमा झाल्या आहेत.

मागणी करूनही कार्यवाही रखडली?

सुमारे महिनाभरापूर्वी कबनूर ग्रामपंचायतीने भटक्या कुत्र्यांचे लसीकरण व निर्बीजीकरण करण्यासाठी इचलकरंजी महापालिकेच्या पशुसंवर्धन विभागाला कळविले होते. यासाठी ग्रामपंचायतीने निधीची तरतूदही केल्याचे सांगण्यात आले होते; मात्र अद्याप या कामाला प्रत्यक्ष सुरुवात झाल्याचे दिसून येत नाही. त्यामुळे प्रशासनाच्या उपाययोजनांबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत.

लसीकरणाचे नियोजन सुरू

ग्रामपंचायत प्रशासक ए. एस. कटारे म्हणाले, इचलकरंजी महापालिकेच्या पशुवैद्यकीय अधिकार्‍यांशी याबाबत चर्चा झाली आहे. निर्बीजीकरणासाठी प्रतिकुत्रा २ हजार ६५० रुपये, तर लसीकरणासाठी प्रतिकुत्रा ३०० रुपये खर्च अपेक्षित आहे. हा खर्च ग्रामपंचायत निधीतून करावा लागणार असल्याने पहिल्या टप्प्यात लसीकरणाचे नियोजन सुरू आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news