

यड्राव : भिक्षेचे पैसे न देणे आणि तक्रार दिल्याच्या रागातून तृतीयपंथीयाने रेकॉर्डवरील गुन्हेगाराच्या साथीने दुसर्या तृतीयपंथीयाच्या घरावर दगडफेक करीत तलवारीने दहशत माजवून मोपेडचे नुकसान केले. तसेच जीवे मारण्याची धमकीही दिली. याप्रकरणी तृतीयपंथी प्रशांत भरत सवाईराम (वय 28, रा. गजानन महाराज खोतवाडी), गणेश बजरंग नेमिष्टे (30, रा. चांदणी चौक इचलकरंजी), मनिषा भरत सवाईराम (36, रा. सावली सोसायटी, शहापुर) या तिघांविरोधात शहापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत गोविंद उर्फ सिया संजय चिकुर्डे (वय 28, तृतीयपंथी, रा. रेणुकानगर यड्राव) यांनी फिर्याद दिली आहे. याप्रकरणी प्रशांत व गणेश यास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
प्रशांत व गोविंद इचलकरंजी परिसरात भीक्षा मागण्याचे काम करतात. गोविंदला बुधवारी सायंकाळी 5 च्या सुमारास प्रशांत याने फोन करून भिक्षेच्या पैश्याबाबत मागणी करुन ती पुर्ण न केल्यास शिवीगाळ केली. भिक्षा मागुन मिळालेल्या पैशातुन पैसे दिले नाहीस तर जीवंत सोडणार नाही अशी धमकी गोविंद यास दिली होती.