Shaktipeeth Highway | शक्तिपीठविरोधात उद्या राज्यव्यापी निदर्शने

कोल्हापुरात रविवारी राज्यव्यापी बैठक
Shaktipeeth highway |
Shaktipeeth HighwayPudhari Photo
Published on: 
Updated on: 

कोल्हापूर : पंढरपूर तालुक्यात शेतकऱ्यांना नजरकैदेत ठेवून शक्तिपीठ महामार्गासाठी जमीन मोजणी केल्याच्या निषेधार्थ ९ ऑक्टोबर रोजी राज्यभर निवेदने देऊन निदर्शने करण्याचा निर्णय शक्तिपीठ महामार्गविरोधी संघर्ष समितीच्या ऑनलाईन बैठकीत घेण्यात आला.

पुढील आंदोलनाची रणनीती ठरविण्यासाठी ११ ऑक्टोबरला कोल्हापुरात प्रमुख प्रतिनिधींची राज्यव्यापी बैठक घेण्यात येणार आहे. पंढरपूरमधील नांदोरे परिसरातील आव्हे, बाव्हे व सोळंकरवाडी येथे पोलिस बंदोबस्तात जबरदस्तीने मोजणी केल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला. या घटनेच्या निषेधासाठी झालेल्या बैठकीस कोल्हापूर, सांगली, सोलापूर, सिंधुदुर्ग, धाराशिव, लातूर, नांदेड, हिंगोली, परभणी, यवतमाळ, वर्धा, सातारा आदी जिल्ह्यांतील शेतकरी सहभागी झाले.

आ. जयंत पाटील म्हणाले, शेतकऱ्यांनी आंदोलनाद्वारे शक्तिपीठ महामार्गाला विरोध करूनही सरकार दुष्काळामध्ये शेतकऱ्यांना मदत करण्याऐवजी त्यांच्या जमिनी काढून घेत आहे. सरकार शेतकऱ्यांना फसवून दडपशाहीने मोजणी करण्याचा प्रयत्न करत आहे. शेतकऱ्यांना घेऊन व्यूहरचना तयार करून आंदोलन करू.

आ. सतेज पाटील म्हणाले, सरकारने शक्तिपीठ महामार्गाचे एक लाख कोटी ही रक्कम दुष्काळग्रस्त शेतकरी व जनतेसाठी द्यावी. शेतकऱ्यांनी लेखी हरकतींद्वारे विरोध दाखवला असतानादेखील हे सरकार हुकूमशहासारखे वागत आहे. कोणत्याही परिस्थितीमध्ये आम्ही शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहू.

माजी खा. राजू शेट्टी म्हणाले, सध्या महाराष्ट्रामध्ये सर्व विभागातील जनतेचा उठाव सुरू आहे. ऊस आंदोलन सुरू आहे, विद्यार्थी आंदोलन करत आहेत. कामगारही आंदोलन करत आहेत. याचवेळी निवडणुका सुरू आहेत या परिस्थितीचा फायदा घेत सरकार गावांमध्ये जबरदस्तीने मोजणी करत आहे. याला जशास तसे उत्तर देऊ. ऊस आंदोलनानंतर एकत्रित या जिल्ह्यांचा दौरा करू.बैठकीला समन्वयक गिरीश फोंडे ,संदीप माटेगावकर, प्रकाश पाटील, संदीप निकम, कृष्णात पाटील, अनिल ब्याळे, शिवाजी कांबळे, राम मगर, कृष्णात साबळे, राहुल मगर उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news