Shaktipeeth Highway: शक्तिपीठ महामार्ग बाधित शेतकऱ्यांची आज राज्यव्यापी ऑनलाईन बैठक

शक्तिपीठ महामार्ग प्रकल्पाविरोधात आंदोलनाची पुढील दिशा ठरवण्यासाठी शनिवारी (दि. 21) सकाळी 11 वाजता राज्यव्यापी ऑनलाईन झूम बैठक आयोजित केली आहे
Shaktipeeth Highway
Shaktipeeth HighwayPudhari
Published on
Updated on

कोल्हापूर : शक्तिपीठ महामार्ग प्रकल्पाविरोधात आंदोलनाची पुढील दिशा ठरवण्यासाठी शनिवारी (दि. 21) सकाळी 11 वाजता राज्यव्यापी ऑनलाईन झूम बैठक आयोजित केली आहे. शक्तिपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समितीने ही माहिती दिली.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका संपताच राज्य सरकारने शक्तिपीठ महामार्ग प्रकल्प गतीने राबविण्याचे धोरण स्वीकारल्याचा आरोप समितीने केला आहे. मराठवाड्यात मागील आठवड्यापासून संयुक्त मोजणी सुरू असून परभणी जिल्ह्यातील ससपूर व जावळा येथे जबरदस्तीने मोजणी करण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे. महिला शेतकऱ्यांवर पोलिसांकडून अमानुष वागणूक दिल्याचाही आरोप समितीने केला आहे.

या पार्श्वभूमीवर बारा जिल्ह्यांतील बाधित शेतकऱ्यांच्या आंदोलनाचा आढावा घेऊन पुढील रणनिती निश्चित करण्यासाठी ही बैठक होणार आहे. बैठकीला आमदार सतेज पाटील, खासदार शाहू महाराज छत्रपती, माजी खासदार राजू शेट्टी, आमदार कैलास पाटील, खासदार विशाल पाटील, आमदार विश्वजित कदम, माजी आमदार ऋतुराज पाटील, माजी आमदार राजेश पाटील, माजी आमदार वैभव नाईक तसेच किसान सभेचे अध्यक्ष राजन क्षीरसागर मार्गदर्शन करणार असल्याची माहिती राज्य समन्वयक गिरीश फोंडे यांनी दिली. सर्व बाधित शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने ऑनलाईन बैठकीत सहभागी व्हावे, असे आवाहन समितीने केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news