वडणगे येथे राज्यस्तरीय ग्रामीण आमदार चषक फुटबॉल स्पर्धेला सुरुवात

तीन जिल्ह्यातील सोळा संघांचा सहभाग
State-level 'Rural MLA Cup' Football Tournament
वडणगे येथे राज्यस्तरीय ग्रामीण आमदार चषक फुटबॉल स्पर्धेला सुरुवात file photo
Published on
Updated on

State-level 'Rural MLA Cup' Football Tournament Kicks Off at Vadange

वडणगे : पुढारी वृत्तसेवा

वडणगे येथे राज्यस्तरीय ग्रामीण आमदार चषक फुटबॉल स्पर्धेला दिमाखात सुरुवात झाली. रविवार १० एप्रिल पर्यंत ही स्पर्धा होणार असून.कोल्हापूर, सांगली व सातारा जिल्ह्यातील १६ ग्रामीण संघ या स्पर्धेत सहभागी झाले आहेत.

State-level 'Rural MLA Cup' Football Tournament
T20 World Cup | पॉवर प्लेचा गेम अन् धावांचा वेग! टीम इंडियाच्या संघनिवडीत 'स्ट्राइक रेट' ठरला सर्वात मोठा फॅक्टर

वडणगे फुटबॉल क्लबच्यावतीने स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. येथील शिव पार्वती क्रीडांगणावर रात्री प्रकाशझोतात या स्पर्धा होत आहेत. आमदार चंद्रदीप नरके यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन झाले.

स्पर्धेच्या पहिल्या फेरीत सांगरुळ, कसबा बीड व जाधववाडी येथील संघानी प्रतिस्पर्धी संघावर मात करून दुसऱ्या फेरीत प्रवेश केला. विजेता, उपविजेता संघ, उत्कृष्ट खेळाडूंना मानाचे चषक, तसेच लाखो रुपयांची रोख बक्षिसे देण्यात येणार आहेत.

State-level 'Rural MLA Cup' Football Tournament
FIFA World Cup : फुटबॉल विश्वात खळबळ! दिग्गज इटली सलग तिसऱ्यांदा फिफा वर्ल्ड कपमधून बाहेर, बोजनिया ठरला 'जायंट किलर'

यावेळी जि. प. सदस्य इंद्रजीत पाटील, वडणगेच्या सरपंच संगीता पाटील चिखलीचे सरपंच रोहित पाटील, दीपक कचरे, वडणगे फुटबॉल क्लबचे रवी मोरे, प्रवीण जाधव, अशोक चौगले, विशाल शेलार यांच्यासह खेळाडू उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news