Kolhapur Mumbai Flight | स्टार एअरची कोल्हापूर-मुंबई सेवा आता आठवड्यातून पाचच दिवस

Kolhapur Mumbai Flight |
Kolhapur Mumbai Flight | स्टार एअरची कोल्हापूर-मुंबई सेवा आता आठवड्यातून पाचच दिवस
Published on
Updated on

उजळाईवाडी : स्टार एअरची कोल्हापूर-मुंबई विमानसेवा आता आठवड्यातील सात दिवसांऐवजी केवळ पाच दिवस सुरू राहणार आहे. ८ सप्टेंबरपासून या सेवेत बदल करण्यात आला असून, रविवार आणि मंगळवारी कोल्हापूर विमानतळावरून मुंबईसाठी विमानसेवा उपलब्ध राहणार नसल्याची माहिती विमानतळ कंपनी व्यवस्थापनाकडून देण्यात आली.

कोल्हापूर विमानतळावरून स्टार एअरच्या माध्यमातून मुंबई, बंगळूर, हैदराबाद, तिरुपती आदी शहरांना विमान सेवेने जोडण्यात आले होते; मात्र कंपनीच्या काही कारणांमुळे गेल्या काही काळात टप्प्याटप्प्याने या सेवांमध्ये बदल झाले आहेत. सध्या कोल्हापूर-मुंबई मार्गावर सकाळच्या सत्रातील विमानसेवा सुरू आहे. गेल्या दोन-तीन महिन्यांपासून सकाळचीच विमानसेवा सुरू असून, पूर्वी सकाळ-संध्याकाळ अशा दोन्ही सत्रांत मुंबई सेवा उपलब्ध होती. त्यात आता आणखी बदल करण्यात आल्याने आठवड्यातील दोन दिवस ही सेवा बंद राहणार आहे. दरम्यान, पुढील महिन्यात कोल्हापूर-मुंबई विमानसेवा पूर्ववत सातही दिवस सुरू होण्याची शक्यता असल्याचा विश्वास विमानतळ व्यवस्थापनाने व्यक्त केला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news