Truck accident news | भरधाव ट्रकची पाच वाहनांना धडक; दुचाकीस्वाराचा मृत्यू

गगनबावडा बसस्थानक चौकातील थरार
Truck accident news |
Truck accident news | भरधाव ट्रकची पाच वाहनांना धडक; दुचाकीस्वाराचा मृत्यू
Published on
Updated on

गगनबावडा : करूळ घाटातून बिडाचे गोळे भरून आलेल्या भरधाव ट्रकने गगनबावडा बसस्थानक चौकात पाच वाहनांना धडक दिली. यामध्ये एका दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. अखिल रमजान थोडगे (वय 22, रा कातळी) असे त्याचे नाव आहे. ही घटना रविवारी रात्री 9.15 वाजण्याच्या सुमारास घडली. यावेळी दोन गायींचाही मृत्यू झाला.

करूळ घाटातून आलेल्या भरधाव ट्रकने भक्त निवास इमारती जवळ दुचाकीवर थांबलेल्या तरुणाला धडक दिली. यावेळी तो तरुण काही फूट अंतरावर जाऊन पडला. दरम्यान, या ट्रकने चौकात रस्त्याच्या बाजूला उभ्या असलेल्या ट्रक, मिनी ट्रॅव्हल व चारचाकी वाहनाला धडक देऊन ट्रक दुकानात घुसला. या अपघातात दुचाकीस्वार अखिल थोडगे याचा जागीच मृत्यू झाला, तर अनिल भलू चव्हाण यांची हॉटेलात थांबलेली पत्नी किरकोळ जखमी झाली.

यानंतर ट्रक छपरात घुसला. याच चौकात रस्त्याच्या बाजूला लावलेल्या मिनी ट्रॅव्हलला धडक देत त्यानंतर लातूरकडे निघालेल्या व गाडी लावून बाथरूमसाठी गेलेल्या एका कारला जोरदार धडक दिली. धडक दिलेल्या सर्व गाड्यांमध्ये सुदैवाने कोणीही प्रवासी नव्हते. नाही तर मोठी दुर्घटना घडली असती. या अपघातात चार मोटारसायकलींचा चक्काचूर झाला आहे. मिनी ट्रॅव्हल, कार व दुकानांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. जखमींवर गगनबावडा ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ट्रकचालक अपघात घडताच पसार झाला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news