Kolhapur Accident : भरधाव ट्रक दुकानासह घरात घुसला; वृद्ध महिला ठार, चालक गंभीर

तुरुकवाडी फाटा येथील घटना
Kolhapur Accident News
Kolhapur Accident News
Published on
Updated on

बांबवडे : तुरुकवाडी (ता. शाहूवाडी) येथे रत्नागिरी- कराड महामार्गावर एका वळणावर ट्रक चालकाचे नियंत्रण सुटल्याने भरधाव ट्रक दुकानासह घरात शिरला. यादरम्यान भरधाव ट्रकने दिलेल्या धडकेत वृद्ध महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला. अनुबाई ईश्वरा पाटील असे या महिलेचे नाव आहे. तर ट्रक चालक विशाल निवृत्ती कदम लांडगेवाडी (ता. कवठेमहांकाळ) हा गंभीर जखमी झाला. ही घटना मंगळवारी (दि.२८) सकाळी ९ च्या सुमारास घडली.

याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, ट्रक (क्रमांक एम. एच. ११ , ए. एल. ५६४८) मंगळवारी सकाळी नऊच्या सुमारास रत्नागिरीहून रेल्वेचे साहित्य घेऊन पुण्याचे दिशेने निघाला होता. यावेळी चालकांचे ट्रकवरील नियंत्रण सुटले व भरधाव ट्रक तुरुकवाडी फाटा येथील वसंत ईश्वरा माईंगडे यांच्या घरात व सचिन वसंत शिंदे यांच्या केश कर्तनालय दुकानात घुसला.

यादरम्यान भरधाव ट्रकने अनुबाई पाटील यांना जोराची धडक दिल्याने त्या गंभीर जखमी झाल्या. त्यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र, उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. तर ट्रकचालक विशाल कदम (वय ४०, रा. लांडगेवाडी ता. कवठेमहांकाळ) हा गंभीर जखमी झाला. तो जखमी अवस्थेत ट्रकमध्येच अडकून होता. ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेऊन त्याला बाहेर काढण्याचे प्रयत्न केले मात्र, प्रयत्न करुनही त्याला बाहेर काढणे शक्य झाले नाही. त्यांना बाहेर काढण्यासाठी जेसीबी मशीनचा वापर करण्यात आला, हा प्रयत्नही असफल ठरला. दोन कटर मशीनच्या सहाय्याने अथक दोन तासांच्या प्रयत्नानंतर त्याला बाहेर काढण्यात यश आले. त्यानंतर त्याला तातडीने कराड येथील कृष्णा हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. तर अनुबाई पाटील यांना इस्लामपूर येथे उपचारासाठी दाखल केले होते, मात्र उपचारापूर्वीच त्याचा दुपारी ४ च्या सुमारास मृत्यू झाला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news