Truck Accident | भरधाव ट्रकची खांबास धडक; विद्युत वाहिनी रस्त्यावर

कोल्हापूर : ट्रकच्या धडकेत सायबर चौक परिसरातील खांब वाकल्‍याने विद्युत वाहिन्या रस्त्यावर लोंबकळत होत्या.
कोल्हापूर : ट्रकच्या धडकेत सायबर चौक परिसरातील खांब वाकल्‍याने विद्युत वाहिन्या रस्त्यावर लोंबकळत होत्या.(छाया : मिलन मकानदार)
Published on
Updated on

कोल्हापूर : सायबर चौक ते एनसीसी भवन मार्गावर वरुटे हॉस्पिटलनजीक शनिवारी मध्यरात्री भरधाव ट्रकने विद्युत खांबास जोराची धडक दिल्याने दोन विद्युत वाहिनी रस्त्यावर कोसळल्या. रात्र गस्तीसाठी असलेले पोलिस कर्मचारी शांतिनाथ बोटे, विकास चव्हाण यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन या मार्गावरची वाहतूक थांबवून अन्य मार्गाने वळविली. तसेच महावितरण कार्यालयाशी संपर्क साधून विद्युत वाहिनी रस्त्यावरून बाजूस करून वाहतूक सुरळीत केली.

शनिवारी (दि. ६) मध्यरात्री सायबर चौक येथील वरुटे हॉस्पिटल परिसरात भरधाव ट्रकने एका विद्युत खांबास जोरदार धडक दिली. या धडकेत खांब वाकल्याने विद्युत प्रवाह सुरू असलेली वाहिनी रस्त्यावर कोसळली, तर दुसरी लोंबकळत राहिली. राजारामपुरी ठाण्याचे पोलिस अंमलदार शांतिनाथ बोटे, विकास चव्हाण यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन काही काळ वाहतूक थांबवून अन्य मार्गाने वळविली. मध्यरात्रीच्या वेळी वेगाने धावणाऱ्या वाहनांमुळे मोठी दुर्घटना होण्याची शक्यता होती; मात्र पोलिसांच्या सतर्कतेमुळे दुर्घटना टळली. त्याचबरोबर महावितरण मदतीने वीजवाहिन्या सुरक्षितपणे बाजूला करत परिस्थिती नियंत्रणात आणली. दोन पोलिस कर्मचाऱ्यांच्या सतर्कतेमुळे दुर्घटना टळली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news