Khidrapur Kopeshwar Temple | खिद्रापूरच्या कोपेश्वर मंदिरात चंद्रदर्शनाचा अद्‌भुत सोहळा

रात्री ११ वाजून ५९ मिनिटांनी चंद्रशिलेवर पडला चंद्रप्रकाश
खिद्रापूर : कोपेश्वर मंदिरात रात्री ११ वाजून ५९ मिनिटांनी स्वर्गमंडपातील गोलाकार झरोक्यातून चंद्राची किरणे थेट मध्यभागी असलेल्या चंद्रशिलेवर पडली.
खिद्रापूर : कोपेश्वर मंदिरात रात्री ११ वाजून ५९ मिनिटांनी स्वर्गमंडपातील गोलाकार झरोक्यातून चंद्राची किरणे थेट मध्यभागी असलेल्या चंद्रशिलेवर पडली.
Published on: 
Updated on: 

बिरू व्हसपटे

कुरुंदवाड : खिद्रापूर (ता. शिरोळ) येथील ऐतिहासिक कोपेश्वर मंदिरात त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त मंगळवारी मध्यरात्री चंद्रदर्शनाचा अनोखा सोहळा पार पडला. रात्री ११ वाजून ५९ मिनिटांनी स्वर्गमंडपातील गोलाकार झरोक्यातून चंद्राची किरणे थेट मध्यभागी असलेल्या चंद्रशिलेवर पडली. आकाशातील चंद्र आणि जमिनीवरील चंद्रशिला यांचा हा अद्‌भुत मिलाफ पाहण्यासाठी जमलेल्या भाविकांनी आनंद व्यक्त केला. या क्षणाने उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले.

बाराव्या शतकातील स्थापत्यकलेचा उत्कृष्ट नमुना असलेल्या कोपेश्वर मंदिरातील स्वर्गमंडपाचे वैशिष्ट्य या निमित्ताने पुन्हा एकदा अनुभवायला मिळाले. ४८ दगडी खांबांवर उभारलेल्या मंडपाच्या छताला असलेल्या गोलाकार झरोक्यातून पौर्णिमेच्या चंद्राचे दर्शन घडते. ठरावीक वेळी चंद्रप्रकाश थेट चंद्रशिलेवर पडत असल्याने या घटनेला विशेष महत्त्व आहे.

या दुर्मीळ दृश्याचा अनुभव घेण्यासाठी रात्रीपासूनच मंदिर परिसरात भाविक, पर्यटक आणि खगोलप्रेमींची गर्दी झाली होती. चंद्र झरोक्यातून दिसू लागल्यापासून उपस्थितांची उत्सुकता वाढली होती. अखेर रात्री ११ वाजून ५९ मिनिटानी चंद्रप्रकाश चंद्रशिलेवर पडताच उपस्थितांनी टाळ्यांच्या गजरात आनंद व्यक्त केला. अनेकांनी मोबाईलमध्ये या क्षणाची छायाचित्रे टिपली.

कोपेश्वर मंदिरातील स्वर्गमंडप हे स्थापत्यकलेचे वैशिष्ट्य मानले जाते. ४८ दगडी खांबांवर उभ्या असलेल्या मंडपाच्या छताला गोलाकार झरोका आहे. या रचनेतून पौर्णिमेच्या रात्री चंद्रप्रकाश थेट मध्यभागी असलेल्या चंद्रशिलेवर पडतो. शतकांपूर्वीच्या वास्तुरचनेतील खगोलशास्त्रीय जाणिवेचा प्रत्यय या सोहळ्यातून येतो.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.