Gold Chain Theft | चैनीसाठी चोरले आईचे साडेतीन तोळ्याचे चिताक

Gold Chain Theft |
Gold Chain Theft | चैनीसाठी चोरले आईचे साडेतीन तोळ्याचे चिताक
Published on
Updated on

कोल्हापूर : महे (ता. करवीर) येथे घरातील लॉकरमधून साडेतीन तोळ्याचे सोन्याचे चिताक लंपास केले होते. करवीर पोलिसांनी २४ तासांत चोरीचा उलगडा केला. मुलानेच चैनीसाठी आईचा दागिना चोरल्याचे तपासात समोर आले. याप्रकरणी बृद्धीराज हिंदुराव वाईंगडे (वय ३४) याला अटक केली.

फिर्यादी शकुंतला हिंदुराव वाईंगडे (वय ६२) यांनी त्यांचे दागिने घरातील देवळीमध्ये असलेल्या लॉकरमध्ये ठेवले होते. १५ ते २२ ऑगस्ट दरम्यान यामधील साडेतीन तोळ्याचे चिताक चोरीस गेल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. आठ दिवस शोधाशोध करून त्यांनी याची फिर्याद रविवारी (दि. ३०) करवीर पोलिस ठाण्यात दिली. पोलिसांनी शिताफीने तपास करून चोरीचा उलगडा केला. पोलिस निरीक्षक रवींद्र कळमकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस अंमलदार महेश बांबळे, रणजित पाटील, विजय तळसकर, श्रीधर जाधव यांनी ही कारवाई केली.

चारचाकी, दुचाकीची खरेदी

ज्या सराफाकडून दागिना तयार करून घेतला होता, त्याच्याकडेच विकण्याची शक्कल बृद्धीराजने लढवली. आलेल्या पैशातून एक सेकंड हँड चारचाकी आणि नवीन दुचाकीची खरेदी केल्याची माहिती समोर आली. हाच धागा पकडून पोलिसांनी तपास करून या चोरीचा छडा लावला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news