Solankur car accident| सोळांकुर येथे कार २० फूट खोल शेतात कोसळली; सुदैवाने जीवितहानी टळली 

एकाच कुटुंबातील चौघेजण जखमी
Solankur car accident| सोळांकुर येथे कार २० फूट खोल शेतात कोसळली; सुदैवाने जीवितहानी टळली 
Published on
Updated on

सरवडे : सोळांकुर ते गैबी घाटा (ता राधानगरी) दरम्यान बाळूमामा मंदिरा नजीकच्या धोकादायक वळणावर पहाटे सहाच्या सुमारास भरधाव कार जवळपास २० फूट खोल शेतात कोसळल्याची थरारक घटना घडली. कार पलटी होऊन झालेल्या या भीषण अपघातात सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी कारचे प्रचंड नुकसान झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, वीरेन मालवण येथील पाचंगे कुटुंबीय कर्नाटकात नातेवाईकांच्या कडे गेली होते. रात्री बाळूमामा मंदिर आदमापुर येथे वास्तव्यास थांबले होते. सकाळी बाळूमामा मंदिरातील आरती आटोपून बाहेर पडले होते. सदर कार घाटातून जात असताना गाडीवरील नियंत्रण सुटले. सोळांकुर येथील धोकादायक वळणामध्ये क्षणार्धात कार रस्ता सोडून थेट घाटाखालील शेतात जाऊन कोसळली. कार खाली पडताना दोन वेळा पालटी झाली, ज्यामुळे गाडीचा पूर्णपणे नुकसान झाले आहे.

यामध्ये कारचालक गोपाळ बाळू पाचंगे वय ३६ रा. (वीरेन मालवण ) यांच्यासह सोनाली गोपाळ पाचंगे (वय३२), देवयानी गोपाळ पाचंगे (वय१४ ), अपूर्वा गोपाळ पाचंगे (वय ८) ही किरकोळ जखमी झाले आहेत. सर्वांच्यावर ग्रामीण रुग्णालय येथे उपचार करून सोडण्यात आले आहे.पहाटेच्या वेळी शांतता असल्याने कार पडण्याचा मोठा आवाज झाला. आवाज ऐकताच परिसरातील  ग्रामस्थांनी तातडीने मदतीसाठी धाव घेतली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news