

कोल्हापूर : टिंबर मार्केट, गंजीमाळ परिसरात दहशत माजवून २५ पेक्षा अधिक वाहनांची तोडफोड केल्याप्रकरणी जुना राजवाडा पोलिसांनी गुरुवारी आणखी सहा संशयितांना अटक केली. न्यायालयाने सर्वांना चार दिवसांची पोलिस कोठडी दिली आहे. फरार हल्लेखोरांचा शोध सुरू आहे, लवकरच त्यांना अटक करण्यात येईल, असे सांगण्यात आले.
सागर सुरेश जाधव (वय ३७, रा. जवाहरनगर), अजय सुनील माने (३३, जवाहरनगर), रोहन दिलीप कांबळे (२०, लाईन बाजार, कसबा बावडा), पृथ्वीराज पिंटू सातपुते (२०, न्यू रमणमळा, कोल्हापूर), सोहम उमेश खताते (२६, मंगळवार पेठ, कोल्हापूर), रोहित दिलीप शिंदे (३८, मंगळवार पेठ, कोल्हापूर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. याशिवाय, दोन अल्पवयीन संशयितांनाही सकाळी ताब्यात घेण्यात आले आहे. सहा संशयितांवरील कारवाईमुळे अटक झालेल्यांची संख्या १३ झाली आहे. तर, एकूण ४ अल्पवयीन संशयितांना ताब्यात घेण्यात आले आहे. तोडफोडप्रकरणी फरार झालेल्या हल्लेखोरांना लवकरच अटक करण्यात येईल, असे पोलिस निरीक्षक किरण लोंढे यांनी सांगितले.