

कोल्हापूर : नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच सराफा बाजारात मोठी दरवाढ पाहायला मिळत असून, मौल्यवान धातूंच्या किमतीने उच्चांक गाठला आहे. चांदीच्या दराने मंगळवार, दि. 6 रोजी चक्क 2 लाख 51 हजार रुपये प्रतिकिलोचा टप्पा ओलांडून इतिहास रचला आहे.
सोन्याचे दरही प्रति 10 ग््रॉम 1 40,900 रुपयांवर पोहोचले आहेत. एकाच दिवसात चांदी दरात एका दिवसात 4 हजार रुपयांची वाढ झाली आहे. सोमवारी (दि. 5) चांदीचा दर 2 लाख 47 हजार रुपये होता. सोन्याचा दर स्थिर असून आधीच्या दिवसाच्या तुलनेत 100 रुपयांची किरकोळ घट नोंदवली गेली आहे. जागतिक बाजारपेठेतील घडामोडी आणि वाढत्या मागणीमुळे ही दरवाढ झाल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. सामान्य नागरिकांच्या खिशाला मात्र या दरवाढीमुळे चांगलीच कात्री बसत आहे. विशेषतः लग्नसराईच्या काळात सोन्या-चांदीने घेतलेल्या या भरारीमुळे सर्वसामान्यांचे बजेट कोलमडले आहे.