kolhapur | हजारो भाविक भक्तिरसात चिंब, ‘चांगभलं’चा गजर

जोतिबा डोंगरावर श्रावण षष्ठी यात्रा उत्साहात
Shravan Shashthi Yatra in full swing on Jyotiba Hill
kolhapur | हजारो भाविक भक्तिरसात चिंब, ‘चांगभलं’चा गजरPudhari File Photo
Published on
Updated on

जोतिबा डोंगर : दख्खनचा राजा श्री जोतिबाच्या डोंगरावर श्री चोपडाई देवीची श्रावण षष्ठी यात्रा ‘चांगभलं’च्या गजरात आणि गुलाल-खोबर्‍याच्या उधळणीत मोठ्या उत्साहात झाली. रात्रभर पावसाच्या सरी झेलत हजारो भाविकांच्या अलोट गर्दीने मंदिर परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला.

गुरुवारी पहाटे श्री जोतिबा आणि चोपडाईची महापूजा बांधली. मुख्य आरती सोहळ्यासाठी देवस्थान समितीचे सचिव व इतर प्रमुख प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते. रात्रभर पुजार्‍यांकडून मंत्रोच्चार आणि स्तोत्रपठण सुरू होतेे. भाविकांची प्रचंड गर्दी लक्षात घेता, प्रशासनाने चोख नियोजन केले होते. दर्शनाच्या रांगा सुरळीत ठेवण्यासाठी पोलिस तैनात होते.

ज्या भाविकांना गर्दीमुळे थेट दर्शन घेणे शक्य झाले नाही, त्यांच्यासाठी देवस्थान समितीने दक्षिण दरवाजाजवळील पार्किंगमध्ये मोठ्या स्क्रीनद्वारे दर्शनाची सोय केली होती. या व्यवस्थेमुळे हजारो भाविकांनी लांबूनच देवाचे रूप डोळ्यांत साठवले. मुख्य बाजारपेठही भाविकांच्या गर्दीने फुलून गेली होती. एकंदरीत, पावसाचे आव्हान असतानाही श्रद्धा, परंपरा आणि सुयोग्य नियोजन यांच्या मिलाफातून ही यात्रा शांततेत व यशस्वीरीत्या पार पडली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news