Warananagar Fire Incident | वारणानगर येथील बझार, कृषी सेवा केंद्राला शाॅर्टसर्किटने आग

दोन लाखांची रोकड खाक; कोट्यवधी रुपयांचे नुकसान
Warananagar Fire Incident |
Warananagar Fire Incident | वारणानगर येथील बझार, कृषी सेवा केंद्राला शाॅर्टसर्किटने आग
Published on
Updated on

वारणानगर : येथील वारणा पेट्रोल पंपासमोर नवीन झालेल्या माऊली सुपर बझार आणि महालक्ष्मी कृषी सेवा केंद्र व गोडाऊनला शनिवारी मध्यरात्री लागलेल्या भीषण आगीत साहित्य, फर्निचर व दोन लाख रुपयांची रोकड, कृषी साहित्य, औषधे जळून खाक झाली. यामध्ये कोट्यवधीचे नुकसान झाले. शॉर्ट सर्किटने आग लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

तेजसिंह सरनाईक यांचे महालक्ष्मी कृषी सेवा केंद्र तर कृष्णात पाटील व विजय चव्हाण (तिघेही रा. बहिरेवाडी, ता. पन्हाळा) यांचा माऊली सुपर बझार आहे. शनिवारी रात्री एकच्या सुमारास शाॅर्टसर्किट होऊन माऊली सुपर बझारला आग लागली. आगीतील स्फोटाच्या आवाजामुळे सरनाईक कुटुंबीय व तेथील वसतिगृहातील मुलांना जाग आली. त्यांनी आरडा- ओरडा केला. वारणा कारखान्याच्या अग्निशमन दलाने आग विझविण्याचा प्रयत्न केला. मात्र, आगीत बझार मधील धान्याची पोती, साखर, तेलाचे डबे, सीसीटीव्ही कॅमेरे, कॉम्प्युटर खाक झाले. कॅश काऊंटरला असणाऱ्या रोख रकमेची राख झाली.

बझारला लागून असणाऱ्या तेजसिंह सरनाईक यांच्या महालक्ष्मी कृषी केंद्राच्या गोडाऊनला आग लागून कृषी साहित्य जळून खाक झाले. याच इमारतीमध्ये असणारे बॅंक ऑफ इंडियाचे एटीएम मशिनही जळाले. महावितरणच्या अधिकाऱ्यांनी पाठ फिरवल्याने बहिरेवाडी ग्रामस्थांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. कोडोली पोलिस ठाण्याचे सहा.पो.नि. चेतन मसुटगे, मंडल अधिकारी अरुण कांबळे, तलाठी प्रसाद मोहिते, कोतवाल दिलीप खाडे यांनी पंचनामा केला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news