Kolhapur Superstition News : धक्कादायक! कसबा तारळे येथे विठ्ठलाई मंदिर परिसरात भानामती प्रकार!

स्मशानभूमी जवळच्या चिंचेच्या झाडावर तरुण-तरुणीच्या फोटोला खिळा!
Kolhapur Superstition News
Kolhapur Superstition News : धक्कादायक! कसबा तारळे येथे विठ्ठलाई मंदिर परिसरात भानामती प्रकार!file photo
Published on
Updated on

Shocking! Incident of Black Magic Reported in the Vicinity of the Vitthalai Temple at Kasba Tarale!

गुडाळ : आशिष पाटील

राधानगरी तालुक्यातील जागृत आणि पुरोगामी समजल्या जाणाऱ्या कसबा तारळे येथे विठलाई मंदिर आणि स्मशानभूमी परिसरात आज (रविवार) सकाळी भानामती आणि काळया जादूचा प्रकार आढळून आल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे आणि संतापाचे वातावरण पसरले आहे.

Kolhapur Superstition News
Kolhapur Crime : चिरीमिरीला सोकावलेल्या फाळकुट गुंडांची दहशत!

याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, येथील प्रसिद्ध विठ्ठलाई मंदिराच्या मागील बाजूस रांगोळीने तांत्रिक चिन्ह रेखाटून त्यावर मंदिराच्या दिशेकडे ठेवलेल्या काळ्या रंगाच्या बाहुल्यावर हळद-कुंकू टाकलेले आढळून आले. सकाळी लवकर हा प्रकार ग्रामस्थांच्या निदर्शनास येताच ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले. गावात ही वार्ता वाऱ्यासारखी पसरताच घटनास्थळी बघ्यांची गर्दी झाली.

दरम्यान, नदीघाटा शेजारी असलेल्या स्मशानभूमी परिसरात एका चिंचेच्या झाडावर असाच काळ्या जादूचा प्रकार काही ग्रामस्थांच्या रविवारी सकाळीच निदर्शनास आला. स्मशानभूमी शेजारच्या गर्द झाडीत एका चिंचेच्या झाडावर युवक- युवतीचे फोटो काळया बाहुलीवर लावून बाहुली खिळे मारून चिंचेच्या झाडाला टांगलेल्या अवस्थेत असल्याचे दिसून आले.

Kolhapur Superstition News
Kolhapur Superstition News | सरूड-शिंपे मार्गावर 'करणी'चा प्रकार; लिंबू, नारळ आणि हळद-कुंकवाचा सडा पाहून दहशतीचे वातावरण

या प्रकारमुळे ग्रामस्थ संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करत असून गावातील सीसीटीव्हीच्या माध्यमातून हे अघोरी कृत्य करणाऱ्यांचा छडा लावावा व त्यांच्यावर जादूटोणा कायद्यांतर्गत पोलिसांनी कडक कारवाई करावी अशा प्रतिक्रिया ग्रामस्थ व्यक्त करत आहेत.

सामाजिक कार्यकर्ते दिपक पाटील, रमेश साबळे, शैलेश माजगावकर, रोहित पाटील, निलेश जाधव, अनिकेत शिपेकर या युवकांनी सदरच्या बाहुल्या दहन करून नष्ट केल्या. राधानगरी तालुक्यातील कसबा तारळे येथील विठ्ठलाई मंदिर परिसरात आणि स्मशानभूमीत अघोरी जादू करण्यात आली होती.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news