

पुढारी वृत्तसेवा
दोघांचेही पहिले लग्न मोडले... पण दोघांनाही पहिल्या लग्नातून प्रत्येकी दोन मुले... त्यांनी एकमेकांशी लग्न केले... पण या नव्या पतीचा पत्नीच्या पहिल्या लग्नापासूनच्या मुलांवर डोळा...त्यातून त्याने तिच्या एका सात वर्षीय मुलाला विकून टाकल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
या प्रकरणी पतीसह सहा जणांविरोधात हुक्केरी पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. यात कोल्हापूरच्या महिलेचा समावेश आहे. चार लाखाला विकलेल्या या मुलाला पोलिसांनी पुन्हा त्याच्या आईकडे सुपूर्द केले.
मिळालेली अधिक माहिती अशी की, संगीता गुडाप्पा कम्मार (वय 30, मूळ रा. ब्यातनाळ, ता. हनगल, जि. हावेरी, सध्या रा. सुल्तानपूर, ता. हुक्केरी) या महिलेला पहिल्या पतीपासून दोन मुले आहेत. यानंतर तिने सदाशिव शिवबसाप्पा मगदूम (रा. सुल्तानपूर) याच्याशी दुसरा विवाह केला.
सदाशिवलाही पहिल्या पत्नीपासून दोन मुले असून ती त्याच्याजवळच असतात. घरी चार मुले झाल्याने त्यांचा सांभाळ करण्यात आर्थिक अडचणी येत होत्या.
सदाशिवने या मुलाला संशयितांपैकी लक्ष्मी बाबू गोलबावी (वय 38, रा. भडगाव, ता. गडहिंग्लज, सध्या रा. सुल्तानपूर) हिच्याकडे सुपूर्द केले. तिने या मुलाला आपण सांभाळायला अनुसया गिरमल्लाप्पा दोडमनी (वय 50, रा. कसरोळ्ळी, ता. हल्याळ, जि. कारवार) हिच्याकडे दिल्याचे सांगितले. त्यामुळे मुलाचा आई निर्धास्त बनली. पत्नी संगीताला मूल सांभाळायला देत आहोत, हे दाखवण्याचे नाटक होते, हे नंतर स्पष्ट झाले.
कारण, लक्ष्मी व अनुसयाने हे मूल कोल्हापूर येथील संगीता विष्णइ सावंत (वय 40, रा. महावीर कॉलेजजवळ, कोल्हापूर नागाळा पार्क) हिला दिले होते. तिने भरत रघुनाथ पुजारी (रा. लोंढा, ता. खानापूर) याला गाठून मुलाच्या विक्रीबाबत माहिती दिली.
दिलशाद सिकंदर तहशीलदार (रा. गांधीनगर, बेळगाव) या महिलेला मुलगा हवा होता. त्यामुळे हे मूल तिने चार लाखांना विकत घेतले. यापैकी 1 लाख 40 हजाराची रक्कम सावत्र बाप सदाशिव मगदूमला दिली, तर उर्वरित 2 लाख 60 हजाराची रक्कम ही उर्वरित पाच जणांनी वाटून घेतली. र