

जोतिबा डोंगर येथे रविवारी छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरातील एका दुकानात प्रसाद म्हणून विकल्या जाणार्या कुंद्यात ब्लेडचे पान सापडले. याप्रकरणी जोतिबा ग्रामपंचायतीचे माजी सदस्य सुनील नवाळे यांनी संबंधित कुंदा व्यापार्याला संपर्क करून संताप व्यक्त केला.
पत्रकार परिषदेत नवाळे म्हणाले, जोतिबा डोंगरावर गेल्या काही वर्षांपासून भेसळयुक्त पेढे विकले जात आहेत. मात्र, अन्न व औषध प्रशासन विभाग आणि जिल्हा प्रशासन कोणतीही कारवाई करत नाही.
उत्पादक, घाऊक व्यापारी आणि दुकानदार यांच्यात मिलीभगत आहे. पेढे विक्रेते, अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकार्यांवर कारवाई करावी. कारवाई न झाल्यास तीव— आंदोलन छेडू. यावेळी प्रदीप धडेल, उत्तम सातार्डेकर, नारायण लादे, युसूफ सय्यद, रामचंद्र मिटके, गोरख कांबळे, महेश मिटके आदी उपस्थित होते.