Shiye Phata Accident | शिये फाटा येथे महामार्ग कामापूर्वी सेवा मार्ग खुले करा; भाजपची मागणी

Shiye Phata Accident | डंपरच्या धडकेत तरुणाचा मृत्यू; शिये फाट्यावरील सेवा मार्ग तातडीने खुले करण्याची मागणी
Shiye Phata Accident
Shiye Phata Accident
Published on: 
Updated on: 

नागाव : नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरू करण्यापूर्वी शिये फाटा परिसरातील सेवा मार्ग (सर्व्हिस रोड) तत्काळ खुले करावेत, अशी मागणी भारतीय जनता पक्षाच्या वतीने करण्यात आली. करवीर तालुका उत्तर मंडल अध्यक्ष विकास पाटील आणि पदाधिकाऱ्यांनी बुधवारी घटनास्थळी भेट देत महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरले.

Shiye Phata Accident
Kolhapur Crime | महिलेचा फोटो, बाहुली आणि अंड्यावर नाव टाकून अघोरी कृत्य..... ! नागाव परिसरात खळबळ

मंगळवारी सकाळी शिये फाटा येथे डंपरच्या भीषण धडकेत भुये येथील राहुल ऊर्फ बंडा शिंदे या मोटरसायकलस्वार तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला. या अपघाताच्या पार्श्वभूमीवर भाजप पदाधिकाऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेत भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना घटनास्थळी पाचारण केले होते.

यावेळी प्राधिकरणाच्या वतीने सल्लागार कंपनीचे निवासी अभियंता सुनील जाधव आणि ठेकेदार कंपनीचे अधिकारी उपस्थित होते. पदाधिकाऱ्यांचे म्हणणे ऐकून घेत त्यांनी यावर तातडीने योग्य ती कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले.

Shiye Phata Accident
Kolhapur Leopard Sighting : नागाव येथे बिबट्यासदृश प्राण्याचे दर्शन; नागरिकांमध्ये घबराट

पुणे-बंगळूर आणि नागपूर-रत्नागिरी हे दोन्ही प्रमुख महामार्ग शिये फाटा येथे एकत्र येतात. सध्या नागपूर-रत्नागिरी महामार्गाचे काम नव्याने सुरू असून, दुसरीकडे पुणे-बंगळूर महामार्गाचे सहापदरीकरण रखडले आहे. या दुहेरी कोंडीमुळे वाहनधारकांना दररोज जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे.

कामातील तांत्रिक आणि किरकोळ त्रुटीच प्रवाशांच्या जीवावर बेतत असून, या सर्व त्रुटी अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिल्याचे विकास पाटील यांनी सांगितले. याप्रसंगी शियेचे माजी उपसरपंच यशवंत पाटील, भुये ग्रामपंचायत सदस्य कृष्णात चौगले, अमर शिंदे, हृदयनाथ सुतार, बाबासो पाटील, सागर पाटील, जयसिंग पाटील, प्रवीण पाटील आदी पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.