Shivrajyabhishek Day | शिवराज्याभिषेक दिनाचा मुख्य सोहळा शनिवारी न्यू पॅलेसमध्ये

पूर्वसंध्येला जुना राजवाड्यात मराठा लाईट इन्फंट्रीच्या बॅण्डचे सादरीकरण
Shivrajyabhishek Day |
Shivrajyabhishek Day | शिवराज्याभिषेक दिनाचा मुख्य सोहळा शनिवारी न्यू पॅलेसमध्ये
Published on
Updated on

कोल्हापूर : छत्रपती चॅरिटेबल देवस्थान ट्रस्ट, शहाजी छत्रपती म्युझियम ट्रस्ट व छत्रपती शाहू विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने शिवराज्याभिषेक दिन सोहळा प्रतिवर्षीप्रमाणे दिमाखात साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्ताने शुक्रवार, दि. ५ व शनिवार, दि. ६ जून रोजी जुना व नव्या राजवाड्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

रयतेचे स्वतंत्र सार्वभौम स्वराज्य निर्माण करणाऱ्या शिवछत्रपतींचा ३५२ वा शिवराज्याभिषेक दिन सोहळा राजधानी रायगडासह संपूर्ण महाराष्ट्र, देशात आणि जगभर दि. ६ जून रोजी साजरा होत आहे. या अंतर्गत छत्रपतींची राजधानी असणाऱ्या करवीरनगरी कोल्हापुरातही हा सोहळा आयोजित करण्यात आला आहे. मुख्य सोहळा शनिवारी (दि. ६) सकाळी ७ वाजून ४५ मिनिटांपासून ते १० वाजेपर्यंत नवीन राजवाड्याच्या दरबार हॉलमध्ये पारंपरिक शाही थाटात होईल. शिवछत्रपतींच्या सुवर्ण मूर्तीवर अभिषेकाच्या मुख्य सोहळ्यास खासदार शाहू महाराज, राजे परिवारातील सदस्य, शासकीय अधिकारी, लोकप्रतिनिधी, समाजातील मान्यवर व शिवभक्त उपस्थित राहणार आहेत. यानिमित्त शाहीर विशारद आझाद नायकवडी यांचा पोवाडा, इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत यांचे व्याख्यान आणि समूह गीतांचे सादरीकरण होणार आहे.

मराठा लाईट इन्फंट्रीचा सिलव्हर बॅण्ड

शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या पूर्वसंध्येला शुक्रवारी सायंकाळी साडेसहा वाजता, भवानी मंडप जुना राजवाडा येथे मराठा लाईट इन्फंट्रीच्या वाद्यवृंदाचे सादरीकरण होईल. भारतीय सैन्य दलातील सर्वात जुना बँण्डने राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावर सादरीकरण केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news