Vice Chancellor Dr. Kamat | शिवाजी विद्यापीठाला आंतरराष्ट्रीय स्तरावर नेण्यासाठी विकासाचा रोडमॅप तयार करणार

कुलगुरू डॉ. कामत यांची ग्वाही; डॉ. प्रतापसिंह जाधव यांच्याशी विविध विषयांवर चर्चा
कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाचे नूतन कुलगुरू डॉ. आर. के. कामत यांनी शुक्रवारी दै. ‘पुढारी’च्या मुख्य कार्यालयास भेट दिली. याप्रसंगी दै. ‘पुढारी’चे मुख्य संपादक डॉ. प्रतापसिंह जाधव यांच्याशी विविध विषयांवर चर्चा केली. यावेळी ‘पुढारी’ माध्यम समूहाचे चेअरमन डॉ. योगेश जाधव, प्र-कुलगुरू डाॅ. ज्योती जाधव उपस्थित होते.
कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाचे नूतन कुलगुरू डॉ. आर. के. कामत यांनी शुक्रवारी दै. ‘पुढारी’च्या मुख्य कार्यालयास भेट दिली. याप्रसंगी दै. ‘पुढारी’चे मुख्य संपादक डॉ. प्रतापसिंह जाधव यांच्याशी विविध विषयांवर चर्चा केली. यावेळी ‘पुढारी’ माध्यम समूहाचे चेअरमन डॉ. योगेश जाधव, प्र-कुलगुरू डाॅ. ज्योती जाधव उपस्थित होते. (छाया : पप्पू अत्तार)
Published on
Updated on

कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाला आंतरराष्ट्रीय स्तरावर नेण्यासाठी पाच वर्षांच्या विकासाचा रोडमॅप तयार करून सविस्तर चर्चा करणार असल्याची ग्वाही नूतन कुलगुरू डॉ. आर. के. कामत यांनी दिली.

डॉ. कामत व प्र-कुलगुरू डॉ. ज्योती जाधव यांनी शुक्रवारी सायंकाळी दै. ‘पुढारी’च्या मुख्य कार्यालयात दै. ‘पुढारी’चे मुख्य संपादक डॉ. प्रतापसिंह जाधव व ‘पुढारी’ माध्यम समूहाचे चेअरमन डॉ. योगेश जाधव यांची भेट घेतली. याप्रसंगी उभयतांमध्ये विविध विषयांवर चर्चा झाली. याप्रसंगी शिवाजी विद्यापीठाचे जनसंपर्क अधिकारी डॉ. आलोक जत्राटकर प्रमुख उपस्थित होते.

कुलगुरू डॉ. कामत यांनी शिवाजी विद्यापीठात सुरू असलेल्या नवीन उपक्रमांची माहिती देत विद्यापीठास प्रगतिपथावर नेण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे सांगितले. ते म्हणाले, विद्यापीठात डॉ. ग. गो. जाधव पत्रकारिता अध्यासनाचे काम पूर्णत्वास येत आहे. अध्यासनात येणाऱ्या काळात नवीन कोर्सेस, राज्य व देशभरातील तज्ज्ञ मान्यवरांची भेट आणि व्याख्याने आयोजित केली जाणार आहेत. तसेच, पत्रकारितेतील देश व जगभरातील नवीन गोष्टी सुरू करणार असल्याचा मानस त्यांनी व्यक्त केला.

डॉ. प्रतापसिंह जाधव यांनी दै. ‘पुढारी’ व शिवाजी विद्यापीठाचे ऋणानुबंध असल्याचे सांगितले. दै. ‘पुढारी’च्या ८० वर्षांच्या वाटचालीची माहिती देत त्यांनी अनेक जुन्या-नव्या आठवणींना उजाळा दिला. विद्यापीठातील डॉ. ग. गो. जाधव पत्रकारिता अध्यासन हे देशातील पत्रकारितेचे एकमेव अध्यासन आहे. आगामी काळात हा परिसर पूर्णपणे जर्नालिझम कॅम्पस म्हणून ओळखला जावा. रोजगाराभिमुख नवीन छोटे-छोटे कोर्सेस सुरू करावेत. तसेच, ललित केंद्रास ऊर्जितावस्था आणण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे डॉ. जाधव यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news