kolhapur | शिवाजी विद्यापीठ-कोल्हापूर इंजिनिअरिंग असोसिएशनमध्ये सामंजस्य करार

कुलगुरू डॉ. कामत; कौशल्य विकास अभ्यासक्रम अन् ‘प्रोफेसर ऑफ प्रॅक्टिस’ योजना राबवणार
कोल्हापूर :  कोल्हापूर इंजिनिअरिंग असोसिएशनच्या ८० व्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलताना शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. आर. के. कामत. शेजारी असोसिएशनचे अध्यक्ष  कमलाकांत कुलकर्णी, उपाध्यक्ष श्रीकांत दुधाणे, सचिव नितीन वाडीकर, प्रसन्न तेरदाळकर  आदी.
कोल्हापूर : कोल्हापूर इंजिनिअरिंग असोसिएशनच्या ८० व्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलताना शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. आर. के. कामत. शेजारी असोसिएशनचे अध्यक्ष कमलाकांत कुलकर्णी, उपाध्यक्ष श्रीकांत दुधाणे, सचिव नितीन वाडीकर, प्रसन्न तेरदाळकर आदी.(छाया : पप्पू अत्तार)
Published on
Updated on

कोल्हापूर : कोल्हापूरचे उद्योग क्षेत्र आणि विद्यापीठ यांच्यात समन्वय निर्माण होण्याची गरज असून त्यासाठी शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर इंजिनिअरिंग असोसिएशनसोबत सामंजस्य करार करणार असल्याची घोषणा शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. आर. के. कामत यांनी केली. कोल्हापूर इंजिनिअरिंग असोसिएशनच्या ८० व्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

डॉ. कामत म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठाच्या माध्यमातून आपण ७० स्टार्टअप्स सुरू करण्यास सहकार्य केले, ज्यातील अनेक आता यशस्वी उद्योग म्हणून प्रस्थापित झाले आहेत. हेच मॉडेल आता आपण कोल्हापुरातही राबवणार आहोत. हा करार आणि योजना प्रभावीपणे राबवण्यासाठी एक ‘स्पेशल पर्पज व्हेईकल’ कंपनी स्थापन करण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. असोसिएशनचे अध्यक्ष कमलाकांत कुलकर्णी यांनी प्रास्ताविकात असोसिएशनच्या ८० वर्षांच्या वाटचालीचा आढावा घेतला. प्रदीप व्हरांबळे यांनी सूत्रसंचालन केले. सचिव नितीन वाडीकर यांनी आभार मानले. व्यासपीठावर उपाध्यक्ष श्रीकांत दुधाणे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

‘प्रोफेसर ऑफ प्रॅक्टिस’ योजना

दीर्घ अनुभवी व्यक्तींच्या अनुभवाचा फायदा विद्यार्थ्यांना व्हावा, यासाठी कोल्हापुरात ‘प्रोफेसर ऑफ प्रॅक्टिस’ ही योजना सुरू करण्यात येणार आहे. परदेशात विद्यापीठे आणि स्थानिक उद्योग मिळून ज्या पद्धतीने विकास साधतात, तोच पॅटर्न आता आपण कोल्हापुरात राबवणार आहोत, असे कुलगुरू डॉ. आर. के. कामत यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news