

कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाचा ६३ वा दीक्षान्त समारंभ २७ नोव्हेंबर रोजी होणार आहे. समारंभात ६० हजार २५० स्नातक पदवी प्रमाणपत्र प्रत्यक्ष व ॲानलाईन पद्धतीने स्वीकारणार आहेत. राज्यपाल जिष्णूदेव वर्मा अध्यक्षस्थान भूषवणार आहेत. लष्करप्रमुख (निवृत्त) जे. जे. सिंग प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.
दीक्षान्त समारंभासाठी काही दिवस उरले असल्याने विद्यापीठ प्रशासनाकडून जय्यत तयारी सुरू झाली आहे. ॲाक्टोबर २०२५ व मार्च २०२६ या सत्रातील आणि यापूर्वीच्या अंतिम परीक्षेमध्ये उत्तीर्ण व पात्र विद्यार्थ्यांनी पदवी व पदविका प्रमाणपत्र ६० हजार २५० ॲानलाईन अर्ज केला आहे. सायन्स अँड टेक्नॉलॉजी, कॉमर्स ॲण्ड मॅनेजमेंट, ह्युमॅनिटीज, इंटर डिसक्लिपनरी स्टडीज या विभागाचे विद्यार्थी पदवी प्रमाणपत्र घेणार आहेत.
पोस्टाने प्रमाणपत्र स्वीकारण्याचे प्रमाण वाढले
यंदाच्या दीक्षान्त समारंभात २० हजार ५३ विद्यार्थी प्रत्यक्ष उपस्थित राहून पदवी प्रमाणपत्र स्वीकारणार आहेत. पोस्टाने ४० हजार १९७ विद्यार्थी पदवी प्रमाणपत्र घेणार आहेत. यात पोस्टाने पदवी प्रमाणपत्र स्वीकारणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या वाढली आहे.