दीक्षान्त समारंभास ग्रंथ दिंडीने प्रारंभ

विद्यार्थ्यांकडून टाळ-मृदंगाचा गजर; वाचन संस्कृतीचा जागर, प्रबोधनपर घोषणा
Shivaji University
शिवाजी विद्यापीठाचा आज दीक्षान्त समारंभ
Published on
Updated on

कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाचा 61 वा दीक्षान्त समारंभ शुक्रवारी (दि. 17) होणार आहे. समारंभाची सुरुवात गुरुवारी ग्रंथ दिंडीसह दोनदिवसीय ग्रंथ महोत्सवाच्या उद्घाटनाने झाली. दीक्षान्त समारंभाच्या निमित्ताने गुरुवारी सकाळी कमला महाविद्यालय येथे कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के यांच्या हस्ते ग्रंथपालखीचे पूजन करण्यात आले. पालखीत भारताचे संविधान, सार्थ श्री ज्ञानेश्वरी, संत नामदेव गाथा यासह राजर्षी शाहू ग्रंथ, आधुनिक विज्ञानाविषयीचे ग्रंथ ठेवले होते. टाळ-मृदंगाच्या गजरात ग्रंथ दिंडीला प्रारंभ झाला. राज्य शासनाच्या ‘वाचन संकल्प महाराष्ट्राचा’ अभियानासह वाचन संस्कृतीचा जागर व प्रबोधनपर घोषणा देत दिंडी राजारामपुरीतून आईचा पुतळा व सायबर संस्थेमार्गे विद्यापीठाच्या प्रांगणात आली. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन करून पालखी राजमाता जिजाऊसाहेब बहुउद्देशीय सभागृहात नेण्यात येऊन तेथे स्थापित करण्यात आली. पालखी मार्गावर सहभागी विद्यार्थी-विद्यार्थिनींचा उत्साह ओसंडून वाहत होता.

ग्रंथ दिंडीमध्ये कुलसचिव डॉ. विलास शिंदे, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. अजितसिंह जाधव, बॅ. बाळासाहेब खर्डेकर ज्ञान स्रोत केंद्राचे संचालक डॉ. धनंजय सुतार, अधिष्ठाता डॉ. श्रीकृष्ण महाजन, डॉ. महादेव देशमुख, डॉ. सागर डेळेकर, डॉ. आर. जी. कुलकर्णी, डॉ. तानाजी चौगले, डॉ. रामचंद्र पवार, डॉ. शरद बनसोडे, कमला महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. तेजस्विनी मुडेकर, डॉ. सुजय पाटील आदींनी सहभाग घेतला.

एनसीसी, एनएसएसचे संचलन

ग्रंथदिंडीमध्ये शहरातील महाविद्यालयांमधील राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांचा सहभाग लक्षणीय होता. राष्ट्रीय छात्र सेनेच्या विद्यार्थिनींचे संचलन लक्षवेधी ठरले. शालेय विद्यार्थ्यांच्या ढोल व झांज पथकांनी लक्ष वेधून घेतले.

कुलगुरूंचा उत्साह...

आवेशपूर्ण पद्धतीने ढोल, ताशा व झांज वादन करीत ग्रंथदिंडीत विद्यार्थ्यांनी उत्साह आणला. कुलगुरू डॉ. शिर्के यांना वादन करण्याचा व त्यांच्यासमवेत छायाचित्र काढून घेण्याचा मोह आवरला नाही.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news