Shivaji University | कौशल्याधारित शिक्षण, संशोधनातून शिवाजी विद्यापीठाची प्रगतीची झेप

Shivaji University |
Shivaji University | कौशल्याधारित शिक्षण, संशोधनातून शिवाजी विद्यापीठाची प्रगतीची झेप
Published on: 
Updated on: 

कोल्हापूर : दर्जेदार शिक्षण, संशोधन व कौशल्य विकासाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना जागतिक स्तरावर सक्षम बनविण्याचा शिवाजी विद्यापीठाचा प्रयत्न आहे. बदलत्या काळाची गरज ओळखून नवीन शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी, रोजगाराभिमुख अभ्यासक्रम, इनोव्हेशन आणि स्टार्टअपला प्रोत्साहन देत विद्यापीठाने शैक्षणिक क्षेत्रात स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे, असे प्रतिपादन कुलगुरू डॉ. आर. के. कामत यांनी केले.

शिवाजी विद्यापीठाच्या ६४व्या वर्धापनदिनानिमित्त महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयातर्फे निर्मित ‘दिलखुलास’ कार्यक्रमात डॉ. कामत यांची विशेष मुलाखत प्रसारित होणार आहे. कोल्हापूर विभागीय माहिती कार्यालयाच्या सहायक संचालक वृषाली पाटील यांनी ही मुलाखत घेतली आहे.

विद्यापीठाच्या शैक्षणिक वाटचालीसह संशोधनातील योगदान, विद्यार्थीभिमुख उपक्रम आणि कौशल्याधारित शिक्षणावर कुलगुरु डॉ. कामत भाष्य केले. ‘कमवा आणि शिका’ योजना, विद्यार्थ्यांसाठीच्या सवलती, फिल्म मेकिंग, मोबाईल जर्नालिझम यांसारखे अभ्यासक्रम विद्यार्थ्यांना स्वावलंबी बनविण्यासाठी उपयुक्त ठरत आहेत, असे त्यांनी सांगितले. पद्मश्री डॉ. ग. गो. जाधव पत्रकारिता अध्यासन आणि संत तुकाराम अध्यासनाच्या कार्याची माहिती त्यांनी दिली. ही मुलाखत १८ ते २० नोव्हेंबरदरम्यान सकाळी ७.२५ वाजता आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवर आणि ‘न्यूज ऑन एअर’ ॲपवर प्रसारित होणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.