

कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाचा 62 वा दीक्षान्त समारंभ बुधवार (दि. 24) रोजी होणार असून, याची जय्यत तयारी सुरू आहे. संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेचे (डीआरडीओ) माजी अध्यक्ष जी. सतीश रेड्डी प्रमुख पाहुणे असणार आहेत.
यावर्षीचा दीक्षान्त समारंभ आठ दिवसांवर येऊन ठेपला आहे. परीक्षा विभागाकडून तयारी सुरू झाली आहे. प्रमुख पाहुणे म्हणून जी. सतीश रेड्डी असणार आहेत. 2008 ते 2022 कालावधीत ‘डीआरडीओ’चे अध्यक्ष होते. एरोस्पेस व रक्षा वैज्ञानिक तसेच क्षेपणास्त्र (अग्नी, नागा, रूद्रम) विकास कार्यक्रमात त्यांची महत्त्वपूर्ण भूमिका राहिली आहे.
संरक्षणमंत्री यांचे वैज्ञानिक सल्लागार व एयरोनॉटिकल सोसाईटी ऑफ इंडियाचे विद्यमान अध्यक्ष आहेत. दीक्षान्त समारंभास प्रभारी कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी, प्रभारी प्र-कुलगुरू डॉ. ज्योती जाधव, कुलसचिव डॉ. व्ही. एन. शिंदे, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. अजितसिंह जाधव प्रमुख उपस्थित असणार आहेत.