Shivsena | मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते दसरा चौकात आज शिवसेना मेळावा

विविध विकासकामांचा प्रारंभ; राजेश क्षीरसागर यांची माहिती
CM Eknath Shinde
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते वेद विद्यालयाच्या वास्तूचे भूमिपूजन झालेFile Photo
Published on
Updated on

कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते बुधवारी महापूर नियंत्रण, आंतरराष्ट्रीय कन्व्हेन्शन सेंटर उभारणे, केशवराव भोसले नाट्यगृहाची उभारणी आदींसह सुमारे ४५०० कोटी रुपयांच्या विकासकामांचा प्रारंभ होणार आहे.

सायंकाळी सहा वाजता हा कार्यक्रम दसरा चौकात होणार आहेत. यानिमित्ताने शिवसेना व त्यांच्याशी संलग्न संघटनांचा मेळावाही होणार असल्याची माहिती राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी दिली.

उद्घाटन व मेळाव्यासाठी शिवसैनिकांची मोठी गर्दी होणार असल्याचे क्षीरसागर यांनी सांगितले. पंचगंगा नदी घाट सुशोभीकरण करणे, पंचगंगा नदी घाट येथे विविध विकासकामे करणे, गांधी मैदान येथे स्ट्रॉम वॉटर ड्रेनेज लाईन टाकणे, कोल्हापूर महानगरपालिका क्षेत्रातील विविध भागांमध्ये रस्ते डांबरीकरण करणे,

शहरात ठिकठिकाणी हेरिटेज लाईट बसविणे, रंकाळा तलाव येथे म्युझिकल फौंऊटेन उभारणे, आकर्षक विद्युत रोषणाई करणे, मिनिचर पार्क तयार करणे, पंचगंगा स्मशानभूमी दुरुस्ती व नूतनीकरण करणे,

सिद्धार्थनगर येथे पूरसंरक्षक भिंत बांधणे, श्री अंबाबाई मंदिर परिसरांतर्गत म्युझिकल हेरिटेज स्ट्रीट लाईट बसविणे, हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे विरंगुळा उद्यान तयार करणे, आदी कामांचा त्यामध्ये समावेश आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news