Kolhapur Crime : शिवसेना शिंदे गटाच्या नेत्यावर कोयत्याने हल्ला

ढोलगरवाडी फाटा येथे भरदिवसा थरार
Kolhapur Crime News
शिवसेना शिंदे गटाच्या नेत्यावर कोयत्याने हल्ला
Published on
Updated on

चंदगड : मनसेचे माजी जिल्हा उपाध्यक्ष‌ व शिवसेना एकनाथ शिंदे गटाच्या नेत्यावर गुरुवारी (दि. ३०) वेंगुर्ला - बेळगाव या राज्यमार्गावर ढोलगरवाडी फाटा (ता. चंदगड) येथे एका तरुणाने कोयत्याने भरदिवसा हल्ला करून गंभीर जखमी केले. प्रताप ऊर्फ पिनू गणपत पाटील (वय ४०, रा. तुर्केवाडी, ता. चंदगड) असे जखमीचे नाव आहे.

या घटनेमुळे चंदगड तालुक्यात खळबळ उडाली आहे, पण हल्ल्याचे कारण मात्र समजू शकले नाही. गुरुवारी सकाळी अकराच्या सुमारास हा प्रकार घडला. त्यांच्या डोकीवर, पायावर कोयत्याने वार केले आहेत. मारेकरी घटनास्थळावरून पसार झाला. रक्तबंबाळ अवस्थेत प्रताप पाटील यांना रुग्णवाहिकेतून उपचारासाठी बेळगाव येथील हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. यावेळी आणखी एकाचा पाठलाग घेऊन हल्ला करण्याचा प्रयत्न झाल्याची चर्चा घटनास्थळी होती. लागलीच घटनास्थळी जाऊन चंदगड पोलिसांनी माहिती घेत तपासाला प्रारंभ केला. जखमीचे नातेवाईक ही घटनास्थळी आले होते.

पण जखमीने अद्याप जबाब न दिल्याने हल्ला नेमका कुणी केला, त्यामागे कोणते कारण आहे, याविषयी चंदगड पोलिसांतून अधिक माहिती मिळू शकली नाही. घटनास्थळी काही वेळ तणावपूर्ण परिस्थिती होती.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news