Pratapsinh Jadhav 80th birthday | डॉ. प्रतापसिंह जाधव यांचे शिवसेना पदाधिकार्‍यांकडून अभीष्टचिंतन

माजी खासदार विनायक राऊत यांच्या हस्ते सत्कार; आगामी निवडणुकांसह विविध विषयांवर चर्चा
Pratapsinh Jadhav 80th birthday
कोल्हापूर : दै. ‘पुढारी’चे मुख्य संपादक पद्मश्री डॉ. प्रतापसिंह जाधव यांचा 80 व्या वाढदिवसानिमित्त सत्कार करताना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते माजी खासदार विनायक राऊत. सोबत ‘पुढारी’ माध्यम समूहाचे चेअरमन डॉ. योगेश जाधव, आमदार सुनील प्रभू, अरुण दुधवडकर, प्रा. नितीन बानुगडे पाटील, विजय देवणे, संजय पवार, रविकिरण इंगवले आदी.
Published on
Updated on

कोल्हापूर : दैनिक ‘पुढारी’चे मुख्य संपादक पत्रमहर्षी डॉ. प्रतापसिंह जाधव यांचे 80 व्या वाढदिवसानिमित्त शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या पदाधिकार्‍यांनी अभीष्टचिंतन केले. शुक्रवारी पुढारी भवन येथे माजी खासदार विनायक राऊत यांच्या हस्ते डॉ. जाधव यांचा फेटा बांधून शाल, पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी पदाधिकार्‍यांनी डॉ. जाधव यांच्याशी आगामी नगरपालिका, जिल्हा परिषद, महापालिका निवडणुकांसह विविध विषयांवर चर्चा केली. याप्रसंगी ‘पुढारी’ माध्यम समूहाचे चेअरमन डॉ. योगेश जाधव उपस्थित होते.

राऊत म्हणाले, नगर पंचायत, नगरपालिका, महापालिका, जिल्हा परिषद निवडणुका आम्ही महाविकास आघाडी म्हणून एकत्र लढविणार आहे. त्याबाबत काँग्रेस, राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार पक्ष), महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांच्यासह अन्य घटक पक्षांशी चर्चा सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. डॉ. जाधव यांनी ठाकरे घराण्याशी गेल्या तीन पिढ्यांशी असलेल्या जिव्हाळ्याचे संबंध आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यासमवेतच्या आठवणींना उजाळा दिला. यावेळी आमदार सुनील प्रभू, उपनेते नितीन बानुगडे पाटील, उपनेते संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर, राज्य संघटक नवेज मुल्ला, उपनेते संजय पवार, सहसंपर्क प्रमुख विजय देवणे, सहसंपर्क प्रमुख हाजी आस्लम सय्यद, जिल्हा प्रमुख रविकिरण इंगवले, जिल्हा प्रमुख संजय चौगुले, जिल्हा प्रमुख वैभव उगळे, जिल्हा प्रमुख सुनील शिंत्रे, शहर प्रमुख सुनील मोदी, महेश उत्तुरे, प्रशांत पोकळे, राहुल माळी यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news