कोल्हापूर : आपल्या पुढाकारानेच कोल्हापुरात सर्किट बेंच झाले, आता खंडपीठासाठी पुढाकार घ्या, अशी विनंती दैनिक ‘पुढारी’चे मुख्य संपादक डॉ. प्रतापसिंह जाधव यांना शिवसेनेच्या शिष्टमंडळाने सोमवारी केली. सर्किट बेंच मंजूर झाल्याने उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख रविकिरण इंगवले यांच्यासह शिवसैनिकांनी दै. ‘पुढारी’ कार्यालयात येऊन डॉ. जाधव यांचे अभिनंदन केले.
मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ कोल्हापुरात व्हावे, यासाठी उभारलेला लढा यशस्वी करणे अशक्य वाटणारी गोष्ट आपल्या योगदानाने यशस्वी झाल्याच्या भावना यावेळी व्यक्त केल्या. या शिष्टमंडळात शहरप्रमुख सुनील मोदी, सहसंपर्कप्रमुख अस्लम सय्यद, उपशहर प्रमुख राजेंद्र पाटील, करवीर तालुकाप्रमुख राजू यादव, वाहतूक सेना जिल्हाध्यक्ष हर्षल पाटील, महिला जिल्हाप्रमुख प्रतिज्ञा उत्तुरे, शहरप्रमुख रिमा देशपांडे, उपशहर प्रमुख दीपाली शिंदे, कामगार सेना जिल्हाध्यक्ष राजू सांगावकर, उपजिल्हा प्रमुख युवा सेना बंडा लोंढे, उपशहर प्रमुख शशिकांत बिडकर, उपशहर प्रमुख सागर साळोखे, महादेव कुकडे, प्रमोद डोंगरे, विकास बुरबुसे आदींचा समावेश होता.