

जयसिंगपूर : शिरोळ तालुक्यातील आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका महाविकास आघाडी एकत्रितपणे ताकदीने लढवणार असून सर्वच मतदारसंघ जिंकण्याचा निर्धार नेत्यांनी व्यक्त केला आहे. याबाबतची अधिकृत घोषणा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माजी खासदार राजू शेट्टी, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते उद्यान पंडित गणपतराव दादा पाटील तसेच शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे) नेते मधुकर पाटील व तालुका प्रमुख संजय अणुसे यांनी पत्रकार परिषदेत केली.
यावेळी महाविकास आघाडीतील तीनही पक्षांमध्ये शिरोळ तालुक्यातील जागावाटप झाल्याची माहिती देण्यात आली. त्यानुसार 7 जिल्हा परिषद मतदारसंघ व 14 पंचायत समिती मतदारसंघांमध्ये पक्षनिहाय वाटप करण्यात आले आहे. यावेळी माजी खासदार राजू शेट्टी, काँग्रेसचे नेते गणपतराव दादा पाटील, शिवसेना उबाठा गटाचे नेते मधुकर पाटील यांनी आपल्या मनोगतांतून कार्यकर्त्यांनी जोमाने तयारीला लागण्याचे आवाहन केले.
पक्षनिहाय जागांचे वाटप निश्चित
काँग्रेस पक्षाला
मिळालेले मतदारसंघ
जिल्हा परिषद : आलास, दत्तवाड, यड्राव
पंचायत समिती : दानोळी, अर्जुनवाड, नांदणी, शिरढोण, अब्दुललाट, आलास.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेला मिळालेले मतदारसंघ
जिल्हा परिषद : अब्दुललाट, नांदणी, दानोळी
पंचायत समिती : अकिवाट, दत्तवाड, गणेशवाडी, कोथळी, उदगाव, चिपरी
शिवसेना (ठाकरे गट)
जिल्हा परिषद : उदगाव
पंचायत समिती : यड्राव, टाकळी.