गव्याच्या हल्‍ल्‍यात शिराळे- वारूणचा तरूण गंभीर जखमी

जखमी युवकावर रूग्‍णालयात उपचार सुरू
Shirale-Varun's young man seriously injured in Gaur attack
गव्याच्या हल्‍ल्‍यात शिराळे- वारूणचा तरूण गंभीर जखमीFile Photo
Published on
Updated on

बांबवडे : पुढारी वृत्तसेवा

शाहूवाडी तालुक्याच्या उत्तर भागातील शिराळेवारूण येथील तरूण गव्याच्या हल्यात गंभीर जखमी झाला, जखमी अवस्थेत त्याला पुढील उपचारासाठी कराडच्या कृष्णा चॅरिटेबल या दवाखान्यात दाखल केले आहे.

या बाबत आधिक माहिती अशी की, शिराळे वारूण येथील मयूर दगडू यादव (वय २५) हा बुधवारी रात्री ९ वाजता आपल्या शेतात जात होता. वाटेत बाध्याचा माळ येथून जात असतांना शेतात असलेल्या गव्याने त्याच्यावर प्राणघातक हल्ला केला. जोराच्या धडकेत मयूर बाजूला फेकला गेला. या नंतर पुन्हा एकदा गव्याने मयूरला धडक दिली. यामुळे मयूर गंभीर जखमी झाला. काही वेळाने रस्त्याने जाणाऱ्या वाटसरूंनी शिराळे वारूण येथील त्याच्या नातलगांना ही माहिती दिली. त्याच अवस्थेत त्याला कराड येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्याची प्रकृती गंभीर असल्याचे त्याच्या नातलगांनी सागितले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news