kolhapur budget | नवतंत्रज्ञानात भरारी घेऊन विकास साधण्याचा संकल्प

स्थायी सभापती विशाल शिराळे यांच्याकडून 1516 कोटींचा अर्थसंकल्प महासभेत सादर
कोल्हापूर ः महापालिकेचा 1516 कोटी रुपयांचा अर्थसंकल्प महापौर रूपाराणी निकम यांच्याकडे  सादर करताना स्थायी समिती सभापती विशाल शिराळे. शेजारी आयुक्त के. मंजुलक्ष्मी, महापालिका पदाधिकारी व स्थायी समिती सदस्य.
कोल्हापूर ः महापालिकेचा 1516 कोटी रुपयांचा अर्थसंकल्प महापौर रूपाराणी निकम यांच्याकडे सादर करताना स्थायी समिती सभापती विशाल शिराळे. शेजारी आयुक्त के. मंजुलक्ष्मी, महापालिका पदाधिकारी व स्थायी समिती सदस्य. (छाया ः मिलन मकानदार)
Published on
Updated on

कोल्हापूर : नवतंत्रज्ञानात भरारी घेऊन कोल्हापूरचा विकास साधण्याचा संकल्प स्थायी समिती सभापती विशाल शिराळे यांनी महापौर रुपाराणी निकम यांच्याकडे सादर केलेल्या अर्थसंकल्पात केला. सभापती शिराळे यांनी सादर केलेल्या 1 हजार 516 कोटींचा अर्थसंकल्प सर्वानुमते सभागृहाने एकमताने मंजूर केला. अर्थसंकल्पात उत्पन्नवाढीवरही भर देण्यात आला आहे.

* प्रदूषणमुक्त कोल्हापूरसाठी 100 इलेक्ट्रिक बसेस वर्षात रस्त्यावर धावतील.

* एमआरडीपी अंतर्गत पूर नियंत्रण प्रकल्पासाठी शासनाकडून 411 कोटींची निविदा अंतिम टप्प्यात.

* शेंडा पार्क येथे 5 एकर जागेत 103 कोटी खर्चून महापालिकेची प्रशासकीय इमारत बांधणार.

* राजोपाध्येनगर, साने गुरुजी वसाहत येथे 50.65 कोटी खर्चून अद्ययावत फिश मार्केट.

* 60 लाख रु. खर्चून 200 श्वानासाठी भटके श्वान शेल्टर बांधण्यात येईल.

* सुरक्षित शहर प्रकल्पाच्या दुसर्‍या टप्प्यांतर्गत 15 कोटींचा टप्पा दोन प्रकल्प राबविणे.

* गटर, ड्रेनेज लाईन सफाईसाठी तीन अत्याधुनिक मशिन घेण्याचे नियोजन.

* शहरातील ब वर्ग आणि क वर्ग तीर्थक्षेत्रांना स्वतंत्र निधी उपलब्ध करून दिला जाणार.

* शहरातील रस्त्यांची स्वच्छता करण्यासाठी तीन स्विपिंग मशिन उपलब्ध होणार आहेत.

* पाणी पुरवठ्यासाठी 35 कोटी वीज बिल येते. हा खर्च कमी करण्यासाठी पुईखडी व बालिंगा येथे 13 मेगावॅटचा सौरऊर्जा प्रकल्प उभारण्याचे नियोजन आहे. 300 किलोवॅटच्या 2.42 कोटींच्या प्रकल्पाला तांत्रिक मंजुरी मिळाली आहे. प्रकल्पातून सुमारे 15 ते 16 कोटींची बचत होईल.

अद्ययावत स्मार्ट वॉशरूम

राजारामपुरी येथे 200 चौ. फुटात अद्ययावत स्मार्ट वॉशरूम बांधण्यात येणार आहे. यात अत्याधुनिक महिला पावडर रूम आणि स्मार्ट वॉशरूमची उभारणी. यात महिला प्रसाधनगृह, सॅनिटरी नॅपकिनसाठी पॅड वेंडिंग मशिन, लहान मुलांसाठी बेबी केअर, चेंजिंग रूम, कॅफे, रिटेल स्टोअर आदी सुविधा.

एलिव्हेटेड कॉरिडॉर

कोल्हापुरातील वाहतुकीला नवी गती देण्यासाठी एलिव्हेटेड कॉरिडॉर प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. तावडे हॉटेल, कावळा नाका, दसरा चौक, तोरस्कर चौक, शिवाजी पूल हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प येत्या वर्षात राबविण्यात येणार असल्याचे सभापती शिराळे यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news