Burglary Case | शिनोळी बुद्रुक, माडवळेत घरफोड्या चार लाख रुपयांचा ऐवज लंपास

Burglary Case |
शिनोळी बुद्रुक : येथे चोरट्यानी फोडलेले तिजोरी.
Published on
Updated on

चंदगड : तालुक्यात घरफोड्यांचे सत्र सुरूच असून शुक्रवारी (दि. 21) भर दुपारी शिनोळी बुद्रुक येथे झालेल्या घरफोडीत तीन लाख रुपयांचा ऐवज तर माडवळे येथे चोरट्यांनी लाख रुपयांचा ऐवज लंपास केला.

शिनोळी बुद्रुक येथे औद्योगिक वसाहत रोडवरील निखिल भरमाना बोकमूरकर यांचे घर आहे. त्यांची पत्नी माहेरी दुपारी बारा ते दोन या दरम्यान गेली होती. यावेळी चोरट्यांनी त्यांच्या घराचा मुख्य दरवाजाचे कुलूप तोडून स्वयंपाक खोलीत डब्यामध्ये ठेवलेले दीड तोळ्याचे मंगळसूत्र व लोखंडी कपाटातील एक तोळे सोन्याचे कुडेझुबे लंपास केले. तसेच निखिल यांची यांची विवाहित बहीण नीता रवी पुजारी (रा. आंबेवाडी, ता. बेळगाव) यांच्या घराचे बांधकाम सुरू असल्याने त्यांनी निखिल यांच्या घरी ठेवण्यात आलेला सात तोळ्यांचा चांदीचा छल्ला व प्रत्येकी दोन तोळ्याच्या दोन चांदीच्या चेनही चोरट्यांनी लंपास केल्या.

दरम्यान, माडवळे येथे मनोहर सुतार यांचे घर फोडून चोरट्यांनी 30 हजार रुपये रोख व अर्धा तोळे सोन्याची चेन लंपास केली. तालुक्यात दोन ठिकाणी घरे फोडल्याची माहिती समजताच गडहिंग्लज उपविभागाचे पोलिस उपाधीक्षक रामदास इंगवले, चंदगडचे पोलिस निरीक्षक विश्वास पाटील यांनी घटनास्थळी रात्री भेट दिली. रात्री उशिरा कोल्हापूर येथील ठसे तपासणी विभागाचे पोलिस उपनिरीक्षक पी. व्ही. वरोटे, सचिन दुधाने, उदय जोशी यांच्या पथकाने घटनास्थळी भेट देऊन ठसे घेतले आहेत. तसेच श्वानपथकालाही चंदगड पोलिसांनी पाचारण केले आहे. या दोन्ही घरफोडीच्या घटनांची नोंद करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत चंदगड पोलिस ठाण्यात सुरू होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news