

कोल्हापूर : दक्षिण विधानसभा मतदारसंघातील जनता ऋतुराज पाटील यांच्या आश्वासनांना कंटाळली आहे. पाच वर्षे आमदार ऋतुराज पाटील यांनी मतदारसंघाकडे पूर्ण दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे यंदा दक्षिण विधानसभा मतदारसंघामध्ये परिवर्तन नक्की आहे, असे प्रतिपादन गोकुळ संचालिका सौ. शौमिका महाडिक यांनी केले.
उमेदवार अमल महाडिक यांच्या प्रचारार्थ नागाव येथे आयोजित करण्यात आलेल्या निर्धार सभेत त्या बोलत होत्या. महाडिक म्हणाल्या, महायुती सरकारने युवक, शेतकरी, ज्येष्ठ नागरिक, महिला, अंगणवाडी सेविका अशा सर्वांनाच न्याय दिला.
नागावात तुम्ही अमल महाडिक यांच्या प्रचार सभेसाठी प्रचंड गर्दी केली. इथे कुणालाही काही देऊन आणलेले नाही. इथे जेवणावळीही घातल्या जाणार नाहीत. सर्व मतदारांचा प्रचंड प्रतिसाद माझी ऊर्जा वाढवणारा आहे, अशा भावना सौ. महाडिक यांनी व्यक्त केल्या. या सभेप्रसंगी कृष्णराज महाडिक, शेतकरी संघटनेचे नेते प्रा. जालिंदर पाटील, ग्रीष्मा महाडिक, सुवर्णा महाडिक, रंगराव तोरस्कर सर, माजी सरपंच संगीता मगदूम, अण्णासो कोराणे, साताप्पा पवार, तानाजी रानगे, चेतना कांबळे, तुकाराम बोडके सर, पवन शेटे, बिपीन पाटील, भगवान कोराणे, किरण पोवार, चेतन पाटील, प्रमोद अतिग्रे, सुभाष कांबळे, विनायक सरदेसाई, सदाशिव मगदूम यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
नागावमध्ये आल्यावर बिरदेवाचे दर्शन घेतले. तिथला भंडारा लागला. अंबाबाईचे दर्शन घेतले. तिथलं कुंकू लागलं आणि इथे आल्यानंतर पहिल्यांदा इथला गुलाल लागला. हा एक शुभसंकेत आहे. कोल्हापूर दक्षिणामध्ये भगवे वादळ येणार हे निश्चित असल्याचे गोकुळच्या संचालिका सौ. शौमिका महाडिक यांनी म्हणाल्या.