Shahapur Drug Case | शहापूर ड्रग्जचे धागेदोरे दिल्लीत; नायजेरियन व्यक्ती मुख्य सूत्रधार

Shahapur drugs racket in Delhi Nigerian man is the mastermind
Shahapur Drug Case | शहापूर ड्रग्जचे धागेदोरे दिल्लीत; नायजेरियन व्यक्ती मुख्य सूत्रधारPudhari File Photo
Published on
Updated on

यड्राव : शहापूर ड्रग्ज प्रकरणातील मुख्य सूत्रधार विक्रेता दिल्लीतील उत्तमनगर येथील असल्याचे तपासात समोर आले आहे. दरम्यान, अमली पदार्थ विक्री व सेवन याबाबत कोणाचीही गय करू नका, याबाबत सखोल चौकशी करून संशयितांच्या मुसक्या आवळा अशा सूचना पोलिस अधीक्षक योगेशकुमार गुप्ता यांनी शहापूर पोलिसांना दिल्या.

कोरोची येथील सॉफ्टवेअर इंजिनिअर वृषभ खरात याच्याकडून 134 ग्रॅम मेफेड्रॉन ड्रग्ज पोलिसांनी जप्त केले. हे ड्रग्ज वृषभ याने दिल्लीतील उत्तमनगर येथे असलेल्या नायजेरियन व्यक्तीकडून आणल्याची कबुली दिली आहे. ही व्यक्ती एका ठिकाणी राहणे अशक्य आहे. वृषभ आणलेले ड्रग्ज कुठे वितरित करीत होता, त्याचे ग्राहक कोण आहेत याबाबतची माहिती पोलिस घेत आहेत. यामध्ये इचलकरंजी परिसरातील तीन ते चार व्यक्तींची नावे समोर आली आहेत. लवकरच त्यांना ताब्यात घेऊ, असे तपासाधिकारी उपनिरीक्षक महावीर कुटे यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news