Kolhapur Football Craze : स्पेनच्या इन्स्टापेजवर कोल्हापुरी फुटबॉलचा जलवा

फुटबॉलवेड्या कोल्हापूरची आंतरराष्ट्रीय पातळीवर दखल
Kolhapur Football Craze
स्पेनच्या इन्स्टापेजवर कोल्हापुरी फुटबॉलचा जलवा
Published on
Updated on

धीरज बरगे

कोल्हापूर : स्पेनच्या सुप्रसिद्ध सेव्हिया फुटबॉल क्लबने इन्स्टाग््राामवरील त्यांच्या अधिकृत पेजवरून कोल्हापूरच्या छत्रपती शाहू स्टेडियमचा फोटो पोस्ट केला आहे. पोस्टमधील फोटोवर छ. शाहू स्टेडियम असा स्पष्ट उल्लेख आहे. तसेच कोल्हापूर हे फुटबॉल जगणारे आणि फुटबॉलचा श्वास असणारे शहर आहे. आपल्या भारत दौऱ्यामध्ये आपण पुढे कुठे जावे, असा प्रश्न पोस्टमधून केला आहे. सेव्हिया एफसीच्या पोस्टमुळे फुटबॉलवेड्या कोल्हापूरची दखल आंतरराष्ट्रीय पातळीवर घेतली गेली आहे. कोल्हापूरच्या फुटबॉल विश्वासाठी हा अभिमानास्पद क्षण आहे.

प. बंगाल, केरळ आणि गोवा राज्यात फुटबॉलला सर्वाधिक पसंती आहे. तीन राज्यांच्या बरोबरीने फुटबॉलवर नितांत प्रेम करणारे आणखी एक शहर म्हणजे कोल्हापूर. कोल्हापूरच्या फुटबॉलला स्वातंत्र्यपूर्व काळापासूनची परंपरा आहे. दुसऱ्या महायुद्धात जर्मनीने पोलंडवर हल्ला केला तेव्हा तेथील नागरिक जगभर पसरले. निर्वासित झालेल्या पोलंडवासीयांची एक तुकडी कोल्हापुरातील वळीवडे येथे आश्रयाला आली. या पोलंडवासीयांकडून कोल्हापूरकरांनी फुटबॉलचे धडे घेतले आणि इथे फुटबॉलची पाळेमुळे रुजण्यास सुरुवात झाली. कोल्हापुरातील संघ आणि पोलंडच्या संघामध्ये फुटबॉलचे सामनेही होऊ लागले.

बिटिश विरुद्ध प्रॅक्टिस सामना बरोबरीत पोलंडवासीयांकडून फुटबॉलचे धडे घेतल्यानंतर 1936 साली बिटिशांची एक तुकडी पुण्याहून बंगळूरकडे जाताना कोल्हापूरमध्ये दोन दिवस मुक्कामाला होती. या तुकडीचा एक फुटबॉल संघही होता. ही माहिती कोल्हापूरच्या प्रॅक्टिस क्लब संघातील खेळाडूंना समजली. त्यांनी बिटिश संघाला आपल्यासोबत सामना खेळण्याची विनंती केली. ब्रिटिश संघानेही ही विनंती मान्य केली आणि बिटिश विरुद्ध प्रॅक्टिस यांच्यात अत्यंत चुरशीने झालेला फुटबॉल सामना 1-1 असा बरोबरीत सुटला. आज सेव्हिया एफसीने छ. शाहू स्टेडियमचा फोटो पोस्ट केल्यानंतर या ऐतिहासिक सामन्याच्या आठवणीला उजाळा मिळाला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news