आशिष पाटील
मंगळवारी संध्याकाळ पासून राधानगरी धरण क्षेत्रात सुरु असलेल्या धुंवाधार पावसामुळे बुधवारी पहाटे 4:50 ते 5:50 या एक तासात तब्बल 5 स्वयंचलित दरवाजे उघडले आहेत. यापूर्वी आठवडाभर दोन दरवाजे सुरु असल्याने आता एकूण 7 ही स्वयंचलित दरवाजे सुरु झाले आहेत.
पहाटे 4:50 मिनिटांनी क्र 5 चा, 4: 53 मिनिटांनी क्र. 3 चा ,5:16 मिनिटांनी क्र.4 चा , 5: 33 मिनिटांनी क्र.1चा ,5: 55 मिनिटांनी क्र.2 चा असे अवघ्या तासाभरात उर्वरित पाच स्वयंचलित दरवाजे उघडले गेले आहेत. धरण क्षेत्रात जोरदार पाऊस सुरू असून पहाटे 6 वाजता 172 मिमी एवढ्या विक्रमी पावसाची नोंद झाली आहे.
भोगावती नदी पात्रात सर्व स्वयंचलित दरवाजांचा मिळून 10 हजार क्युसेक तर विद्युतगृहासाठी चा 1500 क्यूसेक असा एकूण 11 हजार 500 क्यूसेक विसर्ग भोगावती नदीपात्रात सुरू झाला आहे. या विसर्गामुळे पंचगंगेची पाणी पातळी गुरुवारी रात्री पासून पुन्हा वाढणार आहे.