कुरुंदवाड : महापुरामुळे शिरोळ तालुक्यातील पशुधन तेरवाड माळाभागावरती स्थलांतर करण्यात आले आहे. शासनाने चारा छावणी सुरू करून पशुधनाच्या अन्नपाण्याची व्यवस्था करणार, असे आश्वासन दिले होते. मात्र, चारा-छावणी अद्यापही सुरू न झाल्याने पशुधन मालक आणि शेतकऱ्यांनी आपल्या जनावरांच्या पोटाचा प्रश्न निर्माण झाल्याने जनावरे तेरवाडच्या डोंगराळ वावरावरती चरायला सोडली आहेत. तर रस्त्यावरील झाडांच्या फांद्या तोडून वैरण म्हणून जनावराला खायला घातले जात आहे. जनावरांच्या वैरणीची अत्यंत भीषण परिस्थिती निर्माण झाले आहे. शेतकरी व पशुधन मालकातून शासनाची चारा छावणीची घोषणा फसवी असल्याची संतप्त प्रतिक्रिया आहे.
शिरोळ तालुक्यातील कुरुंदवाड येथील चारा छावणीची घोषणा फसवी असल्याची पशुधन मालकांकडून प्रतिक्रिया येत आहेत. जनावरांच्या पोटाचा प्रश्न निर्माण झाल्याने तेरवाड माळावरती जनावरे चरायला सोडली तर झाडांच्या फांद्या तोडून जनावरांना वैरण म्हणून खायला घातले जात आहे..
शेतकरी आणि पशुधन मालकांनी त्यांच्याजवळ होते, ते वैरण समाप्त झाल्याने जनावरांच्या पोटाचा प्रश्न निर्माण झाला आहे. आता वावरामध्ये जनावरांना सोडून त्यांच्या अन्नपाण्याची सोय करण्याची वेळ पशुधन मालक आणि शेतकऱ्यांच्यावर आलेली आहे. ज्या ठिकाणी जनावरे स्थलांतर करण्यात आली आहेत. त्या ठिकाणाहून पशुधन मालक आणि शेतकऱ्यांनी आपली जनावरे तेरवाडच्या डोंगराळ भागावरती चरायला सोडली आहेत. रस्त्यावरील झाडांच्या फांद्या तोडून वैरण म्हणून जनावराला खायला घातले जात आहे. पालकमंत्री जिल्हाधिकारी प्रांत अधिकारी तहसीलदारांनी पाहणी केली, आश्वासनाची खैरात केली. मात्र कोणतेही आश्वासन पूर्ण न केल्याच्या संतप्त प्रतिक्रिया पशुधन मालक, शेतकरी आणि पूरग्रस्तांतून व्यक्त होत आहेत.