kolhapur | सुरक्षारक्षकाला वाहनाच्या बोनेटवरून नेले फरफटत

वाहनचालकाकडून सुरक्षारक्षकांना मारहाण; चालकाला दिला चोप
कोल्हापूर : सीपीआर अपघात विभाग येथील प्रवेशद्वारावरून सुरक्षा रक्षकाला वाहनचालकाने असे बॉनेटवरून फरपटत नेले.
कोल्हापूर : सीपीआर अपघात विभाग येथील प्रवेशद्वारावरून सुरक्षा रक्षकाला वाहनचालकाने असे बॉनेटवरून फरपटत नेले.
Published on
Updated on

कोल्हापूर : छत्रपती प्रमिलाराजे सर्वोपचार रुग्णालयात (सीपीआर) बुधवारी वाहन प्रवेशावरून वाद झाला. वाहनाची चौकशी करण्यासाठी थांबवलेल्या सुरक्षा रक्षकावर चालकाने वाहन घालण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर एका सुरक्षा रक्षकाला वाहनाच्या बोनेटवरून काही अंतर फरफटत नेल्याचा प्रकार घडला. या घटनेत सुरक्षा रक्षकाला किरकोळ दुखापत झाली. वाहनचालकाने सुरक्षा रक्षकांना मारहाण केली. त्यामुळे अन्य सुरक्षा रक्षकांनी चालकाला चोप दिला.

सीपीआरमध्ये विविध विकासकामे सुरू आहेत. अत्याधुनिक सुविधा उपलब्ध होत असल्याने रुग्णालयात उपचारासाठी तसेच विविध कामांसाठी येणाऱ्या नागरिकांची संख्या वाढली आहे. त्यामुळे पार्किंगची समस्या निर्माण झाली असून, वाहनधारकांना शिस्त लावण्यासाठी रुग्णालयाच्या प्रवेशद्वारावर प्रत्येक वाहनाची चौकशी केली जाते.

रुग्णवाहिका, प्रशासकीय कामासाठी येणारी वाहने तसेच डिस्चार्ज झालेल्या रुग्णांना घेण्यासाठी येणाऱ्या वाहनांना आवश्यक तपासणीनंतर प्रवेश दिला जातो. बुधवारी एका वाहनचालकाला सुरक्षा रक्षकांनी चौकशीसाठी थांबवले. यावेळी चालकाने सुरक्षारक्षकांवर वाहन घालण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर एका सुरक्षा रक्षकाला वाहनाच्या बोनेटवरून फरफटत नेले. यामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. संतप्त सुरक्षा रक्षकांनी चालकाला पकडून जाब विचारला. तक्रार देण्यासाठी लक्ष्मीपुरी पोलिसांत गेलेल्या सुरक्षा रक्षकांची संबंधित वाहनचालकाने माफी मागितली. त्यामुळे वादावर पडदा पडला. मात्र, या घटनेमुळे सीपीआरमधील सुरक्षा व्यवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news