Kalamba Central Jail | कळंबा मध्यवर्ती कारागृहाच्या कर्मचाऱ्यांकडूनच सुरक्षेला तडे

अदृश्य साखळी तोडण्याचे प्रशासनासमोर आव्‍हान
Kalamba Central Jail |
Kalamba Central Jail | कळंबा मध्यवर्ती कारागृहाच्या कर्मचाऱ्यांकडूनच सुरक्षेला तडे
Published on
Updated on

कोल्हापूर : राज्यातील सराईत गुंडांचा भरणा असलेल्या कळंबा मध्यवर्ती कारागृहाच्या सुरक्षा व्यवस्थेला कर्मचाऱ्यांकडूनच सुरुंग लावल्याचे समोर येत आहे. कैद्यांना कारागृहात गांजा, मोबाईल पुरवठा करण्याच्या साखळीत कर्मचाऱ्यांचा सहभाग समोर आला असून, यामुळे कुंपणच शेत खात असून, कारागृहातील कैदी, बंदोबस्तावरील कर्मचाऱ्यांमधील अदृश्य साखळी तोडण्याचे आवाहन प्रशासनासमोर आहे.

कळंबा कारागृहात मुंबई, पुण्यासह राज्यभरातील नामचीन गुंडांसह काही आंतरराष्ट्रीय गुन्हेगारही शिक्षा भोगत आहेत. खून, मारामारी, दरोड्यासह, बॉम्बस्फोट, अमली पदार्थांच्या तस्करीमध्ये सहभाग असलेल्या सराईत गुन्हेगारांमुळे कळंबा कारागृह नेहमीच हॉटस्पॉट बनला आहे. कर्मचाऱ्यांची अपुरी संख्या, वर्षानुवर्षे ठाण मांडून बसलेले कर्मचारी, यामुळे कारागृहातील कैदी आणि कर्मचाऱ्यांमध्ये एक अदृश्य युती तयार झाली आहे. कैद्यांना लागणाऱ्या काही वस्तू कर्मचाऱ्यांकडूनच पुरवठा केला जात असल्याचे नुकतेच उघड झाले आहे.

सुभेदार गेंडचा प्रताप

कारागृहात पिशवीतून १७० ग्रॅम गांजा पुरवठा करताना कारागृहाचा सुभेदार बाळासाहेब भाऊ गेंड याला २०२३ मध्ये अटक केली होती. त्याच्या घरझडतीमधून २ किलो ३०० ग्रॅम गांजा, मोबाईल, सिमकार्ड आणि रोख ५० हजार मिळून आले होते. या घटनेमुळे खळबळ उडाली होती. तर, शुक्रवारी पँटमधून कारागृहात गांजा नेणाऱ्या उत्तम पाटील याला अटक केल्यानंतर कारागृहातील अदृश्य साखळीने पुन्हा डोके वर काढल्याचे दिसून आले.

खून, मारामारी, मोबाईल अन् गांजाच

कारागृहात कैद्यांमध्ये वादावादी आणि मारामारीच्या घटना घडत असतात. पण, गेल्या काही वर्षांपासून थेट खून, मोबाईल आणि गांजा सापडण्याचे प्रकार वाढत आहेत. याला गेल्या काही दिवसांपासून पायबंद घालण्यात प्रशासनाला यश आले होते; मात्र शुक्रवारच्या घटनेमुळे कर्मचारीच कारागृहाचा भेदी असल्याचे समोर आले.

कारागृहातील कर्मचाऱ्याकडे गांजा सापडला असून, कर्मचाऱ्यांनी प्रवेशद्वाराजवळच हा गांजा पकडला आहे. उत्तम पाटील याच्यावर निलंबनाचा प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयाकडे पाठविण्यात आला आहे. त्याची खातेअंतर्गतही चौकशी होणार आहे.

विवेक झेंडे, अतिरिक्त कारागृह अधीक्षक

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news