Kidnapping Extortion Case | खंडणीसाठी हॉटेल व्यावसायिकाचे अपहरण करणार्‍या गुंडाच्या घराची झडती

Kidnapping Extortion Case |
मोरेवाडी येथून आलिशान मोटार, लोखंडी रॉड हस्तगत
Published on
Updated on

कोल्हापूर : खंडणीसाठी हॉटेल व्यावसायिकाचे अपहरण, अमानुष मारहाण करणार्‍या कुख्यात गुंड अमोल अशोक जाधव याच्या मोरेवाडी (ता. करवीर) येथील चित्रनगरीजवळील खोलीची राजारामपुरी पोलिसांनी झडती घेतली. अपहरणासाठी वापरलेली आलिशान मोटार, लोखंडी रॉडही हस्तगत करण्यात आले आहे.

पाचगाव (ता. करवीर) येथील खुनाच्या गुन्ह्यात कारावास भोगणारा संशयित अमोल जाधव याची जामिनावर सुटका झाली आहे. संशयितावर यापूर्वी खुनाचे एकूण 5 गुन्हे दाखल झाले होते. आठवड्यापूर्वी अमोल जाधवसह स्वप्नाली कौंदाडे यांनी हॉटेल व्यावसायिक अर्जुन तळेकर याचे राजारामपुरी येथील आठवी गल्ली येथून मोटारीतून अपहरण केले. मोरेवाडी येथील घरात कोंडून घालून त्यास बेदम मारहाण करण्यात आली. शिवाय 1 लाख 30 हजारांची खंडणीही वसूल करण्यात आली. तळेकर याच्या फिर्यादीनंतर राजारामपुरी पोलिसांनी अमोल जाधवसह महिलेला अटक केली आहे.

पोलिसांनी संशयिताच्या खोलीची झडती घेऊन आलिशान मोटार, लोखंडी रॉड हस्तगत करण्यात आला. दरम्यान, पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांनी अमोल जाधवच्या कारनाम्याची गंभीर दखल घेतली असून, प्रतिबंधात्मक कारवाईचा तातडीने प्रस्ताव सादर करण्याच्या प्रभारी अधिकार्‍यांना सूचना दिल्या आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news