Using the 'Swift Chat' app | विद्यार्थ्यांची उपस्थिती, शैक्षणिक प्रगती डिजिटल व्यासपीठावर!

‘स्विफ्ट चॅट’ अ‍ॅप वापराचे ‘एससीईआरटी’चे सर्व शाळांना निर्देश
Using the 'Swift Chat' app
Using the 'Swift Chat' app | विद्यार्थ्यांची उपस्थिती, शैक्षणिक प्रगती डिजिटल व्यासपीठावर!
Published on
Updated on

प्रवीण मस्के

कोल्हापूर : राज्य शिक्षण संशोधन व प्रशिक्षण परिषदेने (एससीईआरटी) सर्व स्थानिक स्वराज्य संस्था, खासगी, अनुदानित आणि अंशतः अनुदानित शाळांमध्ये ‘स्विफ्ट चॅट’ अ‍ॅपमधील ‘स्मार्ट उपस्थिती’ बॉटचा वापर करण्याचे नव्याने परिपत्रक शाळांना काढले आहे. त्यामुळे आता विद्यार्थ्यांची हजेरीदेखील ‘स्मार्ट उपस्थिती’ या नावाने डिजिटल स्वरूपात नोंदवली जाणार आहे. या पद्धतीमुळे शिक्षण विभागाला विद्यार्थ्यांची उपस्थिती, शैक्षणिक प्रगती व माहिती एकाच डिजिटल व्यासपीठावर उपलब्ध होणार आहे.

‘स्विफ्ट चॅट’ या अ‍ॅपमधील ‘स्मार्ट उपस्थिती’ बॉटचा वापर हजेरी नोंदविण्यासाठीचे निर्देश यापूर्वीच ‘एससीईआरटीई’ने 2023 मध्ये दिले होते. त्यानुसार राज्यातील 50 हजार शाळांमध्ये या बॉटची यशस्वी चाचणी करण्यात आली. प्रत्यक्षात मात्र पाचशे शाळांनीच ही प्रक्रिया राबविली. नव्याने ‘एससीईआरटी’ने राज्यातील निवडक शाळांमध्ये ही पद्धत काटेकोरपणे लागू करण्याचे निर्देश दिले आहेत.

शिक्षकांनी शालार्थ पोर्टलवर नोंदवलेल्या मोबाईल क्रमांकाचा वापर करून विद्यार्थ्यांची उपस्थिती ‘अ‍ॅप’च्या माध्यमातून नोंदवावी, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. माहिती संकलन, विश्लेषण आणि पारदर्शकता यासाठी ही प्रक्रिया महत्त्वाची ठरणार आहे. शालेय शिक्षण आता ‘स्मार्ट’ दिशेने वाटचाल करत असून विद्यार्थ्यांच्या उपस्थितीची नवी पद्धत तांत्रिक क्रांती घडवून आणणारी ठरणार आहे.

दुर्गम भागातील काही शाळांमध्ये नेटवर्क समस्या असल्याच्या अडचणी शिक्षकांकडून व्यक्त केल्या जात आहेत. तरीही शिक्षण विभागाने या सर्व बाबींवर लक्ष ठेवण्याचे व आवश्यक तांत्रिक मदत पुरविण्याचे आश्वासन दिले आहे. शिक्षणाधिकारी उपक्रमाच्या अंमलबजावणीवर लक्ष ठेवणार असून सर्व शाळांनी डिजिटल पद्धतीने हजेरी नोंदवावी, असे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news