Gokul Election | १८ ऑक्‍टोबरला तुम्‍ही माझ्‍याबरोबर! आ. सतेज पाटील यांचे धैर्यप्रसाद हॉलच्‍या बाहेरील पोस्‍टर चर्चेत

कोल्‍हापूर : अवसायनातील दूध संस्‍थांच्‍या मेळावा झालेल्‍या धैर्यप्रसाद हॉलबाहेर आ. सतेज पाटील यांचा उभारलेला फलक चर्चेचा ठरला.
कोल्‍हापूर : अवसायनातील दूध संस्‍थांच्‍या मेळावा झालेल्‍या धैर्यप्रसाद हॉलबाहेर आ. सतेज पाटील यांचा उभारलेला फलक चर्चेचा ठरला.
Published on
Updated on

कोल्‍हापूर : ‘गोकुळ’ निवडणुकीच्‍या पार्श्वभूमीवर आमदार सतेज पाटील यांचे छायाचित्र असलेले आणि ‘१८ ऑक्‍टोबरला तुम्‍ही माझ्‍याबरोबर’ असा आशय असलेला डिजिटल फलक धैर्यप्रसाद हॉल परिसरात उभारला आहे. येथेच १,४०० दूध संस्‍थांनी मेळावा घेत अदृश्‍य शक्‍तीला सोबत घेतल्‍यास आम्‍ही तुमच्‍या सोबत नाही, असा इशारा दिला. त्‍यातच बाहेर आ. सतेज पाटील यांचा फलक यावरून ‘गोकुळ’च्‍या राजकीय चर्चेला उधाण आले आहे.

‘गोकुळ’ची निवडणूक महायुती विरुद्ध आ. सतेज पाटील यांची समविचारी आघाडी अशीच होईल, असे नेते सध्‍या सांगत आहेत. मात्र, महायुतीमधील अंतर्गत मतभेद पाहता कशा पद्धतीने आघाडी होईल, हे सध्‍यातरी सांगणे कठीण आहे. अवसायनातील १,४०० दूध संस्‍थांनी मेळावा घेत अदृश्‍य शक्‍तीला सोबत घेतले, तर आम्‍ही तुमच्‍या सोबत नाही, असा इशारा दिला आहे. त्‍यामुळे आता महायुतीमधील घटक पक्षांची गोची होणार आहे. एकीकडे दूध संस्‍था इशारा देत असताना संस्‍थांच्‍या मेळावा असलेल्‍या हॉल बाहेरच आमदार सतेज पाटील यांचे १८ ऑक्‍टोबरला तुम्‍ही माझ्‍यासोबत असा फलक लागला आहे. हा फलक संपूर्ण जिल्‍ह्यात चर्चेचा ठरला आहे. येथे लागलेला फलक हा निव्‍वळ योगायोग म्‍हणायचा का ‘गोकुळ’च्‍या निवडणुकीतील एक राजकीय खेळी हे लवकरच स्‍पष्‍ट होईल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news