Satej Patil: सत्ताधाऱ्यांच्या चुकीच्या कारभाराला ताकदीने विरोध करा

आ. सतेज पाटील यांचे आवाहन; नवनिर्वाचित नगरसेवकांचा काँग्रेस कमिटीमध्ये सत्कार
Satej Patil
Satej Patil: सत्ताधाऱ्यांच्या चुकीच्या कारभाराला ताकदीने विरोध करा Pudhari Photo
Published on
Updated on

कोल्हापूर : महापालिकेत काँग््रेासने भक्कम कामगिरी केली असून महापालिका काँग््रेासच्याच ताब्यात द्यावी, असा कोल्हापूरकरांचा कौल होता. काही चुकीच्या गोष्टींमुळे सत्ता मिळाली नसली तरी लोकहितासाठी सत्ताधाऱ्यांच्या चुकीच्या निर्णयांना सभागृहात ताकदीने विरोध करा, असे आवाहन काँग््रेासचे जिल्हाध्यक्ष आमदार सतेज पाटील यांनी मंगळवारी केले. काँग््रेास कमिटीच्या वतीने आयोजित नूतन नगरसेवकांच्या सत्कारप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खासदार शाहू महाराज होते. स्टेशन रोडवरील काँग््रेास कमिटीच्या सभागृहात हा कार्यक्रम झाला.

आ. सतेज पाटील म्हणाले, कोल्हापूर महापालिकेत काँग््रेासने मोठ्या ताकदीने लढत दिली आहे. महायुतीच्या महाशक्तीविरोधात जनतेची ताकद आपल्यामागे उभी राहिली असून जनतेने काँग््रेासवर विश्वास दाखवला आहे. सत्ता मिळाली नाही याची खंत आहे; मात्र 1999 ते 2004 या काळात विधानसभेत काँग््रेास विरोधी पक्षात असतानाही तत्कालीन नेते आर. आर. पाटील, जयंत पाटील, दिलीप वळसे पाटील यांनी सत्ताधाऱ्यांना प्रभावीपणे जाब विचारला. त्याच धर्तीवर आता कोल्हापूर महापालिकेत लोकांच्या हिताविरोधात जेथे जेथे निर्णय होतील, तेथे काँग््रेासचे 35 नगरसेवक एकसंधपणे आवाज उठवतील.

एक मत मागितल्याने फटका

यंदा पहिल्यांदाच चार मते देण्याचा अधिकार नागरिकांना होता. काही प्रभागांत पॅनेलऐवजी एकेकालाच मत मागण्यात आल्याने त्याचा फटका बसला आणि सत्ता हुकली, असे नमूद करत आ. पाटील यांनी अप्रत्यक्ष टोला लगावला. केवळ दोनच प्रभाग असे आहेत की, जेथे काँग््रेासचा नगरसेवक निवडून आला नाही. अन्यथा उर्वरित 18 प्रभागात काँग््रेासचा एक तरी नगरसेवक निवडून आला आहे. यावेळी आमदार जयंत आसगावकर, माजी आमदार ऋतुराज पाटील, माजी आमदार मालोजीराजे यांची भाषणे झाली. स्वागत माजी नगरसेवक तौफिक मुल्लाणी यांनी केले, तर सूत्रसंचालन वेदवती मोहिते यांनी केले. शहराध्यक्ष सचिन चव्हाण यांच्यासह नगरसेवक राजू लाटकर, प्रवीण केसरकर, दुर्वास कदम, अर्जुन माने, संजय मोहिते, इंद्रजित बोंद्रे, सूर्यकांत पाटील बुद्धीहाळकर, भारती पोवार, आनंद माने, ऋषिकेश पाटील, विनायक घोरपडे आदी उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news