

कोल्हापूर : अलमट्टीची उंची वाढवण्यास तेलगंणा सरकारने विरोध करत सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. राज्य शासनानेही कणखर भूमिका घ्यावी आणि या याचिकेत ‘पार्टी’ होऊन कर्नाटकाचा डाव हाणून पाडावा, असे आवाहन विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना केले.
जनमत मिळेल की नाही याबाबत शंका असल्यानेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणीका पुढे ढकलण्याबाबत वक्तव्ये महायुतीकडून केली जात असल्याचा आरोपही त्यांनी केला. पाटील म्हणाले, कृष्णा पाणी वाटप लवादाने 2013 मध्ये अलमट्टीला उंची वाढवण्यास परवानगी दिली. अलमट्टी प्रश्नी वडनेरे समितीने अहवाल दिला आहे; मात्र, त्याबाबत आम्ही पूर्णपणे सहमत नाही.