राधानगरी : मागच्या दहा वर्षांत काय घडले, कशा तडजोडी झाल्या हे सगळे बाजूला सारूया आणि राधानगरी विधानसभा मतदारसंघाचा नवा इतिहास घडविण्यासाठी के. पी. पाटील यांना मोठ्या मताधिक्याने निवडून देऊया, असे आवाहन आमदार सतेज पाटील यांनी केले. माजी आमदार के. पी. पाटील यांच्या प्रचारार्थ गुडाळ येथे महाविकास आघाडीच्या सभेत ते बोलत होते. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नेते ए. डी. पाटील होते.
सतेज पाटील म्हणाले, गेल्या दहा वर्षांत विद्यमान आमदारांनी काँग्रेसला संपविण्याचे काम केले. यावेळी ही प्रवृत्ती मोठ्या ताकदीने मोडून काढूया. शिवसेना उपनेते विजय देवणे म्हणाले, सतेज पाटील यांनी के. पी. पाटील यांना निवडून आणण्याची जबाबदारी उचलल्याने के.पीं.ना बळ मिळाले आहे. यावेळी माजी आमदार के. पी. पाटील, गोकुळचे माजी संचालक पी. डी. धुंदरे, सदाशिवराव चरापले, सजयसिंह पाटील, वसंतराव पाटील, अशोक पाटील, एकनाथ पाटील, विजय मोहिते, संदीप देसाई, प्रा. विश्वास पाटील, बापूसाहेब किल्लेदार, सुरेश चौगले, दत्तात्रय पाटील, सिकंदर मुल्लाणी आदींची भाषणे झाली. सभेसाठी हिंदूराव चौगले, धैर्यशील पाटील, जनता दलाचे जिल्हाध्यक्ष वसंतराव पाटील, गोकुळचे संचालक अभिजीत तायशेटे, आर. के. मोरे प्रा. किसन चौगले, राहुल देसाई, बी. के. डोंगळे, दत्तात्रय पाटील, दीपसिंह नवणे, शामराव देसाई, सुरेश चौगले, सचिन घोरपडे उपस्थित होते. अभिजित पाटील यांनी प्रास्ताविक केले. यावेळी ऊस तोडणी ओढणी वाहतूक संघटना आणि म्हासुर्ली येथील मुस्लिम समाजाने के. पी. पाटील यांना पाठिंबा दिला. तसेच भाजपचे रामभाऊ पाटील यांच्यासह काही कार्यकर्त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.
या निवडणुकीत कुठल्याही कर्मचार्याने कुणाचाही दबाव घेऊ नका. मी अनेक संस्थांचे नेतृत्व करतोय. तुमच्यासह सर्वसामान्य कार्यकर्त्यांच्या माध्यमातून मला राज्यपातळीवर नेतृत्व करण्याची संधी मिळाली असल्याने तुम्ही सर्वजण महाविकास आघाडी सोबतच राहावे, असे आ. पाटील म्हणाले.