KDCC Bank | सातारा जिल्‍हा बँक निर्णयाचे केडीसीसीत हादरे; ९ संचालकांवर टांगती तलवार

दहा वर्षे संचालक असणार्‍यांची उमेदवारी सर्किट बेंचने ठरविली अवैध
KDCC Bank |
KDCC Bank | सातारा जिल्‍हा बँक निर्णयाचे केडीसीसीत हादरे; ९ संचालकांवर टांगती तलवार
Published on: 
Updated on: 

धीरज बरगे

कोल्‍हापूर : सातारा जिल्‍हा बँक निवडणुकीत सलग दहा वर्षे संचालक असणार्‍या दोघा उमेदवारांची उमेदवारी मुंबई उच्‍च न्‍यायालयाच्‍या कोल्‍हापूर सर्किट बेंचने बुधवारी अवैध ठरविली. न्‍यायालयाने हा निर्णय सातारा जिल्‍हा बँकेसाठी दिला असला, तरी या निर्णयाचे हादरे कोल्हापूर जिल्‍हा मध्‍यवती सहकारी बँकेतही बसले आहेत. या निर्णयामुळे ९ संचालकांच्‍या उमेदवारीवर टांगती तलवार असणार आहे. सर्किट बेंचने यासंदर्भात दिलेल्‍या निर्णयाची प्रत अधिकृत संकेतस्‍थळावर उपलब्‍ध झाल्‍यानंतर याबाबत स्‍पष्‍टता होणार आहे.

राज्‍यात सध्‍या कोल्‍हापूर, सांगली, सातारासह सहा जिल्‍हा बँकांची निवडणूक प्रक्रिया सुरू आहे. दरम्‍यान, सातारा जिल्‍हा बँकेच्‍या निवडणूक प्रक्रियेदरम्‍यान बँकेचे संचालक राजेंद्र राजपुरे, अनिल देसाई यांनी सलग दहा वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केल्‍याने त्‍यांच्‍या उमेदवारीवर आक्षेप घेतला होता. निवडणूक निर्णय अधिकार्‍यांनी आक्षेप फेटाळत त्‍यांची उमेदवारी वैध ठरल्‍याने उमेदवारीचा मुद्दा कोल्‍हापूर सर्किट बेंचमध्‍ये दाखल झाला. निवडणूक निर्णय अधिकार्‍यांच्‍या निर्णयाला आव्‍हान देणार्‍या दोन याचिका दाखल झाल्‍या. याचिकेवर न्‍यायालयाने बुधवारी निर्णय देत राजपुरे, देसाई यांची उमेदवारी अवैध ठरविली.

कोल्‍हापूर जिल्‍हा बँकेची निवडणूक प्रकिया सुरू आहे. तीन नोव्‍हेंबरला अंतिम यादी प्रसिध्‍द केली जाणार आहे. त्या‍नंतर साधारणत: दिवाळीनंतर बँकेचा निवडणूक कार्यक्रम जाहीर होण्‍याची शक्‍यता आहे. जिल्‍हा बँकेतही नऊ संचालकांनी सलग दहा वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केला आहे. त्‍यामुळे आगामी काळात त्‍यांच्‍या उमेदवारीवरही अपात्रतेची टांगती तलवार राहणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news