Sankeshwari chilli price | संकेश्वरी मिरचीचा ठसका : 1 लाख 90 हजार क्विंटलला ऐतिहासिक दर

Sankeshwari chilli price |
Sankeshwari chilli price | संकेश्वरी मिरचीचा ठसका : 1 लाख 90 हजार क्विंटलला ऐतिहासिक दर Adarsh Patil
Published on
Updated on

गडहिंग्लज : गडहिंग्लज कृषी उत्पन्न बाजार समितीत दर बुधवारी व शनिवारी मिरचीचे सौदे होत असतात. आजच्या सौद्यात संकेश्वर मिरचीला आजवरचा विक्रमी दर मिळत इतिहास रचला गेला आहे. गडहिंग्लज येथील मांडेकर यांच्या दुकानात संकेश्वरी मिरचीचा सौदा तब्बल 1 लाख 90 हजार रुपये प्रति क्विंटल दराने झाला. हा दर आजपर्यंतचा सर्वाधिक असून यामुळे बाजारपेठेत मोठी चर्चा रंगली आहे.

तनवडी (ता. गडहिंग्लज) येथील शेतकरी शिवाप्पा आरबोळे यांनी उत्पादित केलेल्या मिरचीला हा उच्चांक दर मिळाला. मेसर्स नानासो जाधव ट्रेडर्स यांनी ही मिरची खरेदी केली. यावर्षी अवकाळी पावसामुळे मिरची पिकाला मोठा फटका बसला असून उत्पादनात घट झाली आहे. परिणामी, बाजारात आवक कमी झाल्याने दरात मोठी उसळी पाहायला मिळाली. मात्र, यंदाचा हा व्यवहार ऐतिहासिक ठरला असून शेतकर्‍यांसाठी दिलासादायक मानला जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news